दाभोलकरांच्या हत्येचा वीरेंद्र तावडेच मुख्य सूत्रधार, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

By admin | Published: September 7, 2016 01:34 PM2016-09-07T13:34:27+5:302016-09-07T14:39:33+5:30

डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे न्यायालयात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे

Dabholkar's murder Virendra Tawde has been named as the main conspirator and chargesheeted by the CBI | दाभोलकरांच्या हत्येचा वीरेंद्र तावडेच मुख्य सूत्रधार, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

दाभोलकरांच्या हत्येचा वीरेंद्र तावडेच मुख्य सूत्रधार, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Next
>- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सीबीआयने दाखल केलेल्या या आरोपपत्रात सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे हाच दाभोलकर हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात सारंग अकोलकर आणि विनय पवार संशयित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. वीरेंद्र तावडे सध्या अटकेत असून सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघेही फरार आहेत. वीरेंद्र तावडे हा सध्या सीबीआय कोठडीत आहे. 
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉ. विरेंद्र तावडेला संशयावरून अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक होती. विरेंद्र तावडेचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे.  
 
१ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते.  छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली. 
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेक-यांना शोधण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 
 

Web Title: Dabholkar's murder Virendra Tawde has been named as the main conspirator and chargesheeted by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.