पुण्यात पेटवून घेऊन दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Published: February 28, 2016 01:52 AM2016-02-28T01:52:12+5:302016-02-28T01:52:12+5:30
बेबडओहळ (ता. मावळ) येथील गंगा पेपर मिल कॉलनीत शनिवारी दुपारी पती-पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण रात्री
तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : बेबडओहळ (ता. मावळ) येथील गंगा पेपर मिल कॉलनीत शनिवारी दुपारी पती-पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
भावना (३६) आणि विकास मिश्रा (४०) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. दोघेही ९० ते ९५ टक्के भाजले होते. हे दाम्पत्य २००६पासून बेबडओहळ येथे वास्तव्यास असून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. ुमुलीस बेडरूमच्या कॉटवर ठेवून दोघे लगतच्या गॅलरीत गेले. तेथे त्यांनी पेटवून घेतले. भाजलेल्या अवस्थेत विकास मिश्रा गॅलरीतून खाली पडले. भावना मिश्रा गंभीर भाजलेल्या अवस्थेत गॅलरीत पडल्या होत्या.
आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला. नागरिकांनी भावना यांना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये हलविले. उपचारापूर्वीच त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (प्रतिनिधी)