पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; मुलीच्या आर्त हाकेने बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 AM2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:32+5:30

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला..., ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. मग...

Dad, come home soon I'm waiting for you The daughter's love pulled the father from the brink of death | पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; मुलीच्या आर्त हाकेने बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचले

पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; मुलीच्या आर्त हाकेने बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचले

Next

 महेंद्र रामटेके -


आरमोरी (जि. गडचिरोली) : ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या... मी तुमची वाट बघत आहे !’ सर्व परिस्थिती विपरीत दिसत असतानाही मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. कुटुंबासाठी तरी आपण जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी मनाशी केला आणि सीटी स्कोअर १८, ऑक्सिजन ७० असताना तब्बल १७ दिवस कोरोनाशी लढा देत विजयी मुद्रेने ते घरी परतले.

ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. डॉक्टरांनी गडचिरोली किंवा नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सीटी स्कोअर वाढून १८वर गेला तर ऑक्सिजन लेव्हल ७०वर आली. थेट आयसीयूमध्ये भरती केले तेव्हा ते पूर्ण खचून गेले होते. नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली. पण डॉक्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला होता. 

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला
भंडाऱ्यातील डॉक्टरांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतरही बोरकर यांच्या पत्नीने हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. त्यामुळे उपचार सुरू झाले. ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीवर त्यांनी एक-एक दिवस मात केली. पत्नीने दिलेली हिंमत, मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली आर्थ साद, मित्रमंडळींनी दिलेला धीर, विश्वास व आधार यामुळे कोरोनावर विजय मिळवू शकलो, असे देवानंद सांगतात.

आप्तस्वकीयांकडून हिंमत व आधार मिळणे गरजेचे
-  ऑक्सिजन पातळी खालावलेले अनेक रुग्ण केवळ भीतीने घाबरून मृत्यूच्या दाढेत पोहोचतात.
-  अशा स्थितीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
 

Web Title: Dad, come home soon I'm waiting for you The daughter's love pulled the father from the brink of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.