दादा- राजेंच्या वादाला ‘बाबां’ची ठिणगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 10:22 PM2017-02-09T22:22:11+5:302017-02-09T22:22:11+5:30

बारामतीला शह देण्यासाठी : ‘सातारा अन् कऱ्हाड’ एकत्र

Dada: The spark of 'Baba' of Raje! | दादा- राजेंच्या वादाला ‘बाबां’ची ठिणगी!

दादा- राजेंच्या वादाला ‘बाबां’ची ठिणगी!

Next

सातारा : राज्यातील तीन महत्त्वांच्या राजकीय नेत्यांचं त्रांगडं सध्या सातारकरांना पाहावयास मिळू लागलंय. राष्ट्रवादीचे खासदार असूनही पक्षाच्याच विरोधात आपले उमेदवार उभे करणाऱ्या उदयनराजेंना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिल्यामुळे अजितदादा आणि उदयनराजे यांच्यातील वादात ठिणगीच पडलीय.
सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दहा गट अन् पंचायत समितीचे वीस गण असून, जवळपास प्रत्येक ठिकाणी उदयनराजेंच्या ‘राजधानी एक्सप्रेस’चे स्वतंत्र डबे जोडले गेलेत. मात्र केवळ नागठाणे गट-गण वगळता इतर ठिकाणी काँग्रेसने आपला एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात उदयनराजेंच्या उमेदवारांना काँग्रेसची साथ मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाल्यानं नव्या समीकरणांना वेग आलाय.
बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आपला विरोध असल्याचे खासदार उदयनराजे सांगत असले तरी त्यांच्या स्वतंत्र आघाडीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी पक्षालाच बसतोय. अशातच त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांची खदखद वाढत चाललीय. सातारा तालुक्यात भाजपनेही आपले उमेदवार उभे
केले असले तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पक्षाच्याच खासदारांविरुद्ध कडवा संघर्ष करण्याची वेळ आलीय. (प्रतिनिधी)




शत्रूचा शत्रू तो आपला मित्र...
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांना उघडपणे विरोध करण्याचं कार्य उदयनराजेंनी केलंय.
राज्याच्या राजकारणातही गेल्या अडीच वर्षांपासून अजितदादा अन् पृथ्वीराज बाबा यांच्यात विस्तू गेल्याचं ऐकिवात नाही. तसेच एकमेकांचे साडू असणारे रामराजे नाईक-निंबाळकर अन् पृथ्वीराज बाबा हेही सातारा जिल्ह्यात एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहत आलेत.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे अन् पृथ्वीराज बाबा
यांची छुपी आघाडी अजितदादा अन् रामराजेंसाठी धोकादायक बनतेय.

Web Title: Dada: The spark of 'Baba' of Raje!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.