डहाणूतील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर अंधारातच

By admin | Published: October 31, 2016 03:37 AM2016-10-31T03:37:22+5:302016-10-31T03:37:22+5:30

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणीमुळे या वर्षी अंधारात जाणार आहे.

Dahanu's farmers are in the dark | डहाणूतील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर अंधारातच

डहाणूतील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर अंधारातच

Next


कासा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणीमुळे या वर्षी अंधारात जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे दिवाळीची खरेदी करण्यास पैसे नाही असे शेतकरी सीताराम कोरडा यांनी सांगितले.
दरवर्षी शेतकरी दिवाळीच्या आधी १० ते १५ दिवस भातकापणी, झोडी, मळणी आदी कामे पूर्ण करत असू आणि गवत विक्री करत. त्यामुळे गरीब व आदीवासी कुटुंबाची दिवाळीची खरेदीही होत असे. तसेच गरीब शाळकरी मुलेही शेतातील बांध व जंगलातील गवाताच्या मोळ््या विकून फटाके व खर्चासाठी थोडेफार पैसे मिळवत असत. त्यामुळे अशा गरीब शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात जाई.
मात्र चालू वर्षी उशिरापर्यंत पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या भातकापण्या अद्याप झालेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी हळवी,भातकापणी केली असली तरी अद्यापी गरवी भातपीके शेतातच आहेत. त्यामुळे झोडणी अळणीची कामे न झाल्याने विक्रीस भात तयार झाले नाहीत. तसेच गवतही अद्याप कापणी झाली नाही.
(वार्ताहर)

Web Title: Dahanu's farmers are in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.