दहीहंडीच्या उंचीला ‘पाच’र?
By admin | Published: August 9, 2014 02:47 AM2014-08-09T02:47:23+5:302014-08-09T02:47:23+5:30
दहीहंडी उत्सवात लहान मुलांना सहभागी करणो व उंच थर लावणो अयोग्य असल्याचे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केल़े
Next
>मुंबई : दहीहंडी उत्सवात लहान मुलांना सहभागी करणो व उंच थर लावणो अयोग्य असल्याचे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केल़े तसेच याला र्निबध घालणारे काही नियम असतील तर ते राज्य शासनाने सादर करावेत अथवा नियम नसल्यास यासाठी काय करता येईल हे स्पष्ट करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत़
दहीहंडीत केवळ पाचच थर लावले जावेत, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका चेंबूर येथील 45वर्षीय महिला कार्यकत्र्या स्वाती सयाजी पाटील यांनी केली आह़े न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने सरकारला नियमांबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले असून, यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आह़े त्यामुळे दहीहंडीमध्ये लहान मुलांच्या सहभागावरून आधीच वाद सुरू असताना न्यायालयाच्या या आदेशाने नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता आह़े तसेच आता शासन काय भूमिका मांडणार याकडेही सर्वाचेच लक्ष लागले आह़े
पाटील या उत्कर्ष महिला सामाजिक संस्थेच्या सचिवदेखील आहेत़ दहीहंडी उत्सवात मंडळे पाचपेक्षा अधिक थर लावतात़ याने अनेक गोविंदांना गंभीर दुखापत होत़े काहींना तर कायमचे व्यंगत्व आले आह़े गेल्या वर्षी या उत्सवात दोन जणांचा बळी गेला तर 365 जण जखमी झाल़े (प्रतिनिधी)
च्पाच थरांचे र्निबध मंडळांना घालावेत़ तसेच उंच थर लावण्याच्या स्पर्धेत एखादा गोविंदा जखमी झाल्यास आयोजकांवर याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
च्खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात न्यायालय म्हणाले, उत्सव साजरा करणा:याला आमचा विरोध नाही़ पण यात कोणाचाही बळी जाता कामा नय़े तसे होऊ नये यासाठी काही तरी नियम असावेत़ त्यामुळे यासाठी काही नियम आहेत का हे शासनाने सांगावे अथवा काय करता येऊ शकते हे स्पष्ट कराव़े