गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘दहीहंडी’

By admin | Published: July 19, 2016 04:08 AM2016-07-19T04:08:44+5:302016-07-19T04:08:44+5:30

गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या कचाट्यात सापडलेल्या दहीहंडी उत्सवाचे वेध पुन्हा तरुणाईला लागले आहेत.

'Dahihandi' on the occasion of Guru Purnima | गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘दहीहंडी’

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘दहीहंडी’

Next


मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या कचाट्यात सापडलेल्या दहीहंडी उत्सवाचे वेध पुन्हा तरुणाईला लागले आहेत. मंगळवारी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शहर-उपनगरातील गोविंदा पथके सरावाचा श्रीगणेशा करणार आहेत. प्रथेप्रमाणे जागेवाल्याच्य आशीर्वादाने दरवर्षी सुरु होतो, आणि नारळीपौर्णिमेच्या दिवशी समाप्त होतो.
दरवर्षीप्रमाणे या उत्सवाला वादाची किनार असली तरीही, यंदाही प्रत्येक दहीहंडी पथकांमध्ये विक्रमांची चर्चा आहे. शिवाय बालगोविंदाच्या सहभागाविषयी यंदाही दहीहंडी समन्वय समिती काय भूमिका घेणार याविषयी खुमासदार चर्चा पथकांमध्ये रंगल्या आहेत.
गोविंदाची पंढरी असलेल्या माझगाव येथील श्री दत्त क्रीडा मंडळ, माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक उत्सव मंडळांचा सराव सुरु होईल. तसेच उमरखाडीचे पथक, बोरिवलीचे शिवसाई पथक, उपनगरातील जोगेश्वरीचे जय जवान यांचाही सराव सुरु होईल. या सरावाच्या काळात बऱ्याच पथकांतील गोविंदा आर्वजून माझगाव येथील दहीहंडी पथकांच्या सरावाला हजेरी लावतात. जेणेकरुन, या विक्रमी दहीहंडी पथकांकडून धडे गिरवून आपापल्या विभागात अचूकपणे थर लावण्याचे प्रशिक्षणही देतात. (प्रतिनिधी)
पाद्यपूजन सोहळ्यांची रीघ
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शहर-उपनगरातील बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन, पाटपूजन आणि मातीपूजन सोहळ््यांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात गणेशगल्ली, सायन प्रतिक्षानगरचा विघ्नहर्ता या मंडळांचेही पाद्यपूजन सोहळे पार पडणार आहेत.

Web Title: 'Dahihandi' on the occasion of Guru Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.