दहीहंडीची आता ‘टुर्नामेंट’
By Admin | Published: July 23, 2016 02:11 AM2016-07-23T02:11:00+5:302016-07-23T02:11:00+5:30
क्रिकेट, फुटबॉल, कॅरम खेळांप्रमाणेच यंदापासून दहीहंडीच्या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई : क्रिकेट, फुटबॉल, कॅरम खेळांप्रमाणेच यंदापासून दहीहंडीच्या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार आहे. १३ व १४ आॅगस्ट रोजी लालबाग, जोगेश्वरी, दहिसर, सांताक्रूझ येथे होणार असून, अंतिम स्पर्धा वांद्रे येथे होणार आहे. त्यामुळे केवळ उत्सवापुरता मर्यादित राहणारा हा सण आता ‘टुर्नामेंट’मुळे अटीतटीचा होणार आहे.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या वर्षीही अशी प्रकारे टुर्नामेंट आयोजित केली होती. त्या एकदिवसीय स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. मात्र यंदा या स्पर्धेचे स्वरूप आणखीन व्यावसायिक करून त्यात गोविंदा पथकांचे कौशल्य पणाला लागणार आहे. या स्पर्धेतून कमीत कमी वेळात सुरक्षित थर रचणाऱ्या विजेत्या संघांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
मुंबईतील चार ठिकाणी होणाऱ्या पहिल्या फेरीतून विजेते ठरलेल्या संघांचे अंतिम सामना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयासमोरील मैदानात होणार आहेत. अंतिम फेरीची तारीख व बक्षीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पुरुष व महिला ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे १२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सुरक्षेच्या उपाययोजनासह पाच थरांचे मनोरे रचण्यास देण्यात येते.
>मुंबईता चार ठिकाणी होणाऱ्या पहिल्या फेरीतून विजेते ठरलेल्या संघांचे अंतिम सामने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयसमोरील मैदानात होणार आहेत. अंतिम फेरीची तारीख व बक्षीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
पुरुष व महिला अशी ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे १२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात.