दहीहंडीचे थर २० फुटांचेच!

By admin | Published: July 2, 2015 04:13 AM2015-07-02T04:13:52+5:302015-07-02T04:13:52+5:30

दहीहंडीची उंची ३५ फूट करावी व १४ वर्षांवरील मुलामुलींना यात सहभाग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला.

DahiHindi layer 20 feet! | दहीहंडीचे थर २० फुटांचेच!

दहीहंडीचे थर २० फुटांचेच!

Next

मुंबई : दहीहंडीची उंची ३५ फूट करावी व १४ वर्षांवरील मुलामुलींना यात सहभाग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबरच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना जास्तीत जास्त २० फूट उंचीचेच थर लावता येतील आणि १८ वर्षांखालील मुलांना यात सहभागी होता येणार नाही.
मुंबई व ठाण्यात राजकीय पक्षांच्या मानाच्या हंड्या लागतात. गेल्यावर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर न्यायालयाने निर्बंध घातल्याने मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याला स्थगिती मिळवली होती. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही या निर्बंधांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार या निर्बंधांची कशी अंमलबजावणी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भर रस्त्यात मंडप उभारू नये व आवाजाची मर्यादा पाळावी, या न्यायालयाच्या आदेशाविरोधात भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याने वातावरण तापले असतानाच दहीहंडीचे काय होणार, या चिंतेत मंडळे आहेत.

व्हिडीओ शूटिंग..
मोठ्या थरांच्या ठिकाणी व संवेदनशील ठिकाणी पोलीस उपायुक्तांनी व्हिडीओ शूटिंग करून घ्यावे, असे निर्देशही शासनाने जारी केले आहेत़.

आयोजकांना आदेश...
गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट द्यावे; थरांखाली जाड गाद्या ठेवा, प्रथमोपचार पेटी ठेवावी़

कोर्टाचे आदेश....
दहीहंडीचा घातक खेळांमध्ये समावेश करावा.
कारवाईसाठी मुंबई पोलीस कायद्यात दुरुस्ती करावी
धर्मादाय आयुक्तांनी आयोजकांना मिळणाऱ्या पैशांची चौकशी करावी.
नियंत्रण समितीने या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवावे.
जखमी गोविंदास तत्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी़ शासनाच्या रुग्णवाहिकांचा यासाठी वापर करावा.
या आदेशाची माहिती
सर्वांना द्यावी.

Web Title: DahiHindi layer 20 feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.