धालेवाडीची गावठी दारूभट्टी अखेर उद्ध्वस्त
By admin | Published: June 9, 2016 01:22 AM2016-06-09T01:22:37+5:302016-06-09T01:22:37+5:30
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धालेवाडी गावाच्या हद्दीत गावठी दारू तयार करण्याची भट्टी जेजुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली.
जेजुरी : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धालेवाडी गावाच्या हद्दीत गावठी दारू तयार करण्याची भट्टी जेजुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या वेळी सुखदेव नामदेव राठोड हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
धालेवाडी गावाच्या हद्दीत रेल्वे रुळाजवळ निर्जन भागात गावठी दारू गाळण्याचा व्यवसाय चालू होता. परिसरातील नागरिकांचीही याबाबत जेजुरी पोलिसांकडे येथील गावठी दारूधंदे बंद करण्याची मागणी होती. जेजुरी पोलिसांनी हद्दीतील दारूधंदे उद्ध्वस्त करण्याची मोहीमच राबवली असून, यापूर्वी ही आंबळे परिसराबरोबरच इतरत्र असणारे गावठी दारू बनवणारे व विकणारे धंदे उद्ध्वस्त केले आहेत. धालेवाडी येथील दारूभट्टीवर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस कर्मचारी संदीप कारंडे, परशुराम पिलाणे, रणजित निगडे, विशाल जावळे, अश्विनी जगताप, अजय अवघडे यांनी छापा घातला. या कारवाईत १००० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर जळाऊ रसायन पोलिसांनी नष्ट करून दारूभट्टी उद्ध्वस्त केली.