पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद

By admin | Published: July 1, 2014 01:56 AM2014-07-01T01:56:26+5:302014-07-01T01:56:26+5:30

इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यापासून तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारक:यांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणावर हाल सुरू आहेत.

Dakshin shadow dark on the Palakhi festival | पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद

पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद

Next
>अभिजित कोळपे -
निमगाव केतकी (जि. पुणो)
इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यापासून तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारक:यांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणावर हाल सुरू आहेत. सोमवारी दुपारच्या विश्रंतीसाठी पालखी गोतंडीत पोहोचेर्पयत उन्हाच्या वाढत्या कडाक्याने वारक:यांना मोठा त्रस सहन करावा लागला. त्यामुळे पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद होताना दिसत आहे. 
सोमवारी सकाळी अंथुण्रेतून पालखी निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाली. दुपारच्या विश्रंतीसाठी 1 वाजता पालखी गोतंडीत पोहोचली. मात्र, येथे पोहोचेर्पयत उन्हाच्या कडाक्याचा वारक:यांना मोठा त्रस जाणवला. डोळ्यांची चुरचुर होणो, अतिसार, हाता-पायांना खाज सुटणो यांमुळे वारकरी हैराण झाले आहेत. उन्हाचा कडाका वाढला असून, वारक:यांना चालताना मोठा त्रस होत आहे. गोतंडीत पाणी आणि पुरेसा आसरा मिळाला नाही. चालणोही अशक्य झाल्याने वारकरी शेत, झाडा -झुडपात, रस्त्याच्या कडेलाच तळपत्या उन्हात आडवे झाले होते. 
जिल्हा परिषदेचे फिरते आरोग्य पथक ठिकठिकाणी वारक:यांची आरोग्य तपासणी करून मलम, गोळ्या देत होते, तर काही ठिकाणी पुण्याच्या रेड स्वस्तिक अभियानातील कार्यकर्ते वारक:यांचे पाय चेपून देत होते.
सायंकाळी साडेचारच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले; परंतु, पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. त्यामुळे काही ठिकाणी वारकरी ‘विठ्ठला पाऊस पाड रे..’ असे साकडे घालत होते.
दोन दिवस इंदापुरात मुक्काम
मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पालखी निमगाव केतकीहून मार्गस्थ होणार असून, रात्रीच्या मुक्कामासाठी इंदापूर शहरातील नारायणदास रामदास विद्यालय येथे पोहोचणार आहे. तसेच, 2 जुलै रोजी पालखीचा इंदापूर येथेच पूर्ण दिवस मुक्काम असेल.
पहिले मोठे गोल रिंगण
बेलवाडीतील छोटय़ा रिंगण सोहळ्यानंतर इंदापूर शहरातील कदम विद्यालयाच्या प्रांगणात तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिला मोठा रिंगण सोहळा होणार आहे. त्यामुळे येथे जय्यत तयारी सुरू आहे.
 
फलटण मुक्कामी वैष्णवांचा मेळा
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चरा
विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल
विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल,
विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा,  तुक्या मुखा विठ्ठल..
या भावनेने विठ्ठल दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर वाटचाल करीत असलेला वैष्णवांचा मेळा सोमवारी महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणा:या ऐतिहासिक फलटण नगरीत दोन दिवसांच्या मुक्कामाकरिता विसावला. माउलींच्या पालखीचे फलटणकरांनी जंगी स्वागत केले. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वारक:यांसमवेत सोमवारी सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला.  या सोहळ्याचे शहराचे प्रवेशद्वार असणा:या जिंती नाक्यावर मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले. माउलींची पालखी शहरातील ऐतिहासिक राममंदिराजवळ आल्यानंतर नाईक निंबाळकर ट्रस्टच्या वतीने माउलींसह वैष्णवांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा आळंदी-पंढरपूर मार्गावर असणा:या विमानतळ येथील पालखी तळावर दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. 

Web Title: Dakshin shadow dark on the Palakhi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.