दलितांसाठी स्वतंत्र न्यायालय हवे

By admin | Published: December 12, 2014 02:02 AM2014-12-12T02:02:20+5:302014-12-12T02:02:20+5:30

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडून गेली आहे. दलितांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत. कवलेवाडापासून ते जवखेडेर्पयतच्या घटना सातत्याने होत आहेत.

Dalits need separate courts | दलितांसाठी स्वतंत्र न्यायालय हवे

दलितांसाठी स्वतंत्र न्यायालय हवे

Next
नागपूर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडून गेली आहे. दलितांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत. कवलेवाडापासून ते जवखेडेर्पयतच्या घटना सातत्याने होत आहेत. त्यामुळे दलित समाज हादरून गेला आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने अशा दलितांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली. नियम 293 अन्वये कायदा व सुव्यवस्थेसंबंधातील प्रस्ताव मांडताना ते बोलत होते. महिलांवरील अत्याचारही कमी झालेले नाही. अल्पवयीन मुलींवर सातत्याने अत्याचार सुरू आहेत.

 

Web Title: Dalits need separate courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.