लासलगांवला 25 जुलैपासुन डाळींब लिलावास सुरूवात.

By admin | Published: July 21, 2016 03:44 PM2016-07-21T15:44:51+5:302016-07-21T15:44:51+5:30

लासलगांव व परीसरातील डाळींब उत्पादक शेतक-यांच्या सोईसाठी दि. 25 जुलै पासुन बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर चालु हंगामातील डाळींब

Dalmud Bilasawa started in Lasalgaon on 25th July. | लासलगांवला 25 जुलैपासुन डाळींब लिलावास सुरूवात.

लासलगांवला 25 जुलैपासुन डाळींब लिलावास सुरूवात.

Next


नाशिक :- लासलगांव व परीसरातील डाळींब उत्पादक शेतक-यांच्या सोईसाठी दि. 25 जुलै पासुन बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर चालु हंगामातील डाळींब ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू करणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांची मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे लासलगांव मुख्य बाजार आवारावर मागील दोन वर्षांपासुन डाळींब या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास परीसरातील शेतकरी व व्यापारी वर्गाकडुन उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

त्यामुळे चालु हंगामातील डाळींब लिलाव सुरू करणेबाबत नुकतीच व्यापारी वर्गाशी चर्चा करून सोमवार, दि. 25 जुलै, 2016 पासुन शासन अध्यादेशातील नविन सुधारणांप्रमाणे सदरचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीसरातील शेतकरी बांधवांनी लासलगांव मुख्य बाजार आवारावर आपला डाळींब हा शेतीमाल बंपर, एस - 1, एस - 2, एस - 3 व एस - 4 (अती मोठा, मोठा, मध्यम, गोल्टी व लहान) याप्रमाणे योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या क्रेटस्मध्ये विक्रीस आणल्यास सदर शेतीमालाची अनुज्ञप्तीधारक अडत्यामार्फत उघड लिलावाद्वारे विक्री करून वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे.

डाळींब हा शेतीमाल खरेदी करण्यासाठी अनेक व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतक-यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे. शेतक-यांनी आपला डाळींब हा शेतीमाल लासलगांव मुख्य बाजार आवारावरच विक्री करावा असे आवाहन सभापती श्री. होळकर यांचेसह उपसभापती श्री. कराड व सदस्य मंडळाने केले आहे.

बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर डाळींब खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापा-यांना तात्काळ लायसेन्स देऊन बाजार आवारावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव बी. वाय. होळकर यांनी केले आहे

तसेच सोमवार, दि. 25 जुलै, 2016 रोजी सकाळी 10.00 वा. होणा-या डाळींब लिलाव शुभारंभ प्रसंगी परीसरातील डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांसह अडते, व्यापारी व इतर मार्केट घटकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य मंडळाने केले आहे.

Web Title: Dalmud Bilasawa started in Lasalgaon on 25th July.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.