प्रदूषणग्रस्त शेतक:यांना नुकसानभरपाई

By admin | Published: August 6, 2014 03:02 AM2014-08-06T03:02:04+5:302014-08-06T03:02:04+5:30

विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली.

Damage to pollutored farmers | प्रदूषणग्रस्त शेतक:यांना नुकसानभरपाई

प्रदूषणग्रस्त शेतक:यांना नुकसानभरपाई

Next
विजय दर्डा यांनी लक्ष वेधले : चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित
नवी दिल्ली : प्रदूषण आणि विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या नागपूर आणि चंद्रपूर या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली. चंद्रपूर हा देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण देशात चंद्रपूर हा सर्वाधिक प्रदूषित जिल्हा बनला आहे. 
वाराणशी, कानपूर, तीरपूर, कारूर किंवा राणीपेठ हे कधीकाळचे सर्वाधिक प्रदूषित जिल्हे आता मागे पडले असून, चंद्रपूर हे प्रदूषित जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर आले
आहे. चंद्रपुरात कोळसा खाणी, ऊर्जा, सिमेंट आणि रसायन कारखाने 
तसेच पेपर मिल असल्यामुळे या जिल्ह्यातील प्रदूषण वाढत असून, तो पहिल्या क्रमाकांवर आला आहे. 
 एका राज्यापाठोपाठ 
दुस:या राज्याला किंवा प्रदेशाला आपल्या कवेत घेणारा प्रदूषण हा काही विशिष्ट प्रश्न नाही. कारखान्यांमधून बाहेर पडणारी रसायने शेतजमिनी प्रदूषित करीत आहेत. भूमिगत पाण्यातील प्रदूषणाचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर होत आहे.
 विषारी प्रदूषणकारी घटक केवळ शेतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण नागपूर भागासाठी चिंतेचा विषय ठरले आहे, असे खा. दर्डा यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
वाठोडय़ात घातक रसायने.
च्बुटीबोरी हे नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र असून, तेथील अनेक उद्योगांतून बाहेर पडणारे रसायन आणि अन्य घातक द्रव्ये चोरनाल्यातून वाठोडा भागात सोडली जातात. त्यामुळे हा भाग पूर्णपणो प्रदूषित झाला आहे. शेतजमीन नापीक बनली असून, पिके घेता येत नाहीत. 
च्या परिसरातील लोकांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण वनक्षेत्र धोक्याच्या विळख्यात साडपले असून, कधीकाळी असलेले घनदाट जंगल अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. 
च्हजारो शेतक:यांनी आपत्तींबाबत अधिका:यांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
 
कोणती कारवाई केली?
च्विषारी उत्सजर्नामुळे शेतजमिनी गमावलेल्या शेतक:यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी. सरकारच्या दुर्लक्षामुळे किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले याबाबत सरकारने तपास करावा. 
च्संबंधित दोषी अधिका:यांवर कोणती कारवाई करण्यात आली, किती जणांवर खटले दाखल झाले याची माहिती द्यावी, अशी मागणीही खा. दर्डा यांनी केली.

 

Web Title: Damage to pollutored farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.