दमाणी साहित्य पुरस्कार यंदापासून बंद!

By Admin | Published: December 12, 2014 01:29 AM2014-12-12T01:29:53+5:302014-12-12T01:29:53+5:30

मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षापासून बंद करण्यात आला आहे.

Damani Sahitya Award has been closed! | दमाणी साहित्य पुरस्कार यंदापासून बंद!

दमाणी साहित्य पुरस्कार यंदापासून बंद!

googlenewsNext
रवींद्र देशमुख ल्ल सोलापूर
मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षापासून बंद करण्यात आला आहे. पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष झाल्यानंतर हे काम थांबवावे, या दमाणी परिवाराच्या निर्णयानुसारच पुरस्कार बंद 
करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे कार्यवाह 
अरविंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.
गतवर्षी भैरूरतन दमाणी यांची जन्मशताब्दी होती. एखाद्या व्यक्तीच्या स्मृत्यर्थ सुरू केलेला उपक्रम त्या व्यक्तीच्या जयंतीची किंवा पुण्यतिथीची शताब्दी झाल्यानंतर 
तो बंद करण्याची राजस्थानी समाजामध्ये प्रथा आहे. त्या पाश्र्वभूमीवर दमाणी परिवाराने पुरस्कार वितरणाचा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला, असे कुलकर्णी यांनी सांगितले. कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे पुरस्कार निवड समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. ते म्हणाले की, एका अमराठी परिवाराने मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राने या उपक्रमाचे कौतुक केले. 
पुरस्कारासाठी साहित्यकृती निवडण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्यामुळे आजवर केवळ 
गुणवंत साहित्यिक या पुरस्काराचे मानकरी ठरले. साहित्य अकादमीच्या पुरस्काराप्रमाणोच दमाणी पुरस्काराला महत्त्व प्राप्त झाले. 
हा पुरस्कार आता बंद होतोय, याबद्दल खंत वाटते. साहित्यकृतींची निवड करण्यासाठी पत्रकार स्व. वसंतराव एकबोटे, स्व. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, स्व. कवीवर्य 
दत्ता हलसगीकर यांनी आतार्पयत परीक्षक म्हणून काम पाहिले होते. कवीवर्य ल्बोल्ली, प्रा. दास, डॉ. 
गीता जोशी हेही या निवड समितीचे सदस्य होते.

 

Web Title: Damani Sahitya Award has been closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.