महिलांसाठी दामिनी पथक
By admin | Published: March 8, 2016 02:04 AM2016-03-08T02:04:17+5:302016-03-08T02:04:17+5:30
गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्यात वाढीस लागलेल्या महिलांशी निगडित गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता, जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी ‘दामिनी
अलिबाग : गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्यात वाढीस लागलेल्या महिलांशी निगडित गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता, जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी ‘दामिनी’ पथकाची निर्मिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केली आहे. मंगळवारी जागतिक महिला दिनी हे दामिनी पथक जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दामिनी पथकासाठी रायगड पोलीस दलात कार्यरत महिला पोलिसांपैकी २३ महिला पोलिसांची निवड करण्यात आली आहे. या दामिनी पथकातील २३ महिला पोलिसांचे, रायगड पोलीस मुख्यालयात २३ फेब्रुवारी ते ७ मार्च या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करुन त्यांना मोटारसायकल चालविण्याचे उत्तम प्रशिक्षण मोटार परिवहन विभागाने तर व्हॉटस्अॅप, फेसबुक, एटीएम फ्रॉड, महिलांसंबंधित सायबर गुन्हे तसेच संगणकीय प्रशिक्षण रायगड पोलीस दलाच्याच सायबर सेलने दिले आहे. महिलांविषयी गुन्ह्यांबाबत तसेच त्याचे निराकरण करण्याबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्याख्याने व कौशल्य प्रशिक्षण दिले. दामिनी पथकाच्या महिलांना इंग्रजीचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. ८ मार्चला रायगड पोलीस मुख्यालयात या पथकाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.