जयसिंगपूर येथील प्रसिध्द व्यापारी दानचंद घोडावत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:49 AM2019-04-27T11:49:15+5:302019-04-27T11:52:20+5:30
जयसिंगपूर येथील प्रसिध्द व्यापारी दानचंद खिवराज घोडावत (वय ८४ )यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष ,उद्योगपती संजय घोडावत व उद्योगपती विनोद घोडावत यांचे ते वडील होत.
जयसिंगपूर : येथील प्रसिध्द व्यापारी दानचंद खिवराज घोडावत (वय ८४ )यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत व उद्योगपती विनोद घोडावत यांचे ते वडील होत.
सन १९५० साली व्यापाराच्या निमित्ताने घोडावत कुटुबिय जयसिंगपूर येथे आले. छत्रपती शाहू महाराज यांनी जयसिंगपूर ही व्यापारपेठ सुरु केल्यामुळे दानचंद घोडावत यांनी याठिकाणी तंबाखू व्यापार सुरू केला होता.
सामाजिक बांधीलकी जोपासत त्यांनी दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना केली.ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आजही मदत केली जाते.जयसिंगपूर येथे निवास स्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले ,सुना,नांतवंडे असा परिवार आहे. रविवारी सकाळी उदगांव वैकुठधाम येथे सकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार आहे.