दांडेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

By admin | Published: January 7, 2017 03:20 AM2017-01-07T03:20:38+5:302017-01-07T03:20:38+5:30

दांडेकर महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी चहाडे या आदिवासी बहुल भागात वनराई बंधारा बांधला.

Dandekar's students built forest block | दांडेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

दांडेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

Next


पालघर : दांडेकर महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी चहाडे या आदिवासी बहुल भागात वनराई बंधारा बांधला. त्यातील पाण्याचा वापर करून परिसरातील शेतकरी दुबार पीके घेऊ शकणार आहेत. हे शिबिर सात दिवसाचे निवासी होते. ते चहाडे प्राथमिक शाळेत संपन्न झाले.
पाण्याचे महत्व जाणून हा बंधारा चहाडे-कासपाडा येथे बांधला गेला. तसेच लायन्स क्लब आॅफ पालघरच्या आर्थिक सहाय्याने चहाडे केंद्रशाळा, धानवी पाडा प्राथमिक या शाळा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रंगवून दिली.
लालठाणे आणि गोवाडे आश्रमशाळेतील स्वयंस्वच्छता या उपक्रमातंर्गत जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांचे हात धुवून, नखे कापून त्यांना स्वच्छतेचे धडे दिले. तसेच त्यांचे उसवलेले कपडेही शिवून दिले. ‘विद्यार्थ्यांनी आपला गुणात्मक विकास साधण्याचा सदैव प्रयत्न करावा, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष हितेंद्रभाई शहा यांनी यावेळी केले. शिबिरात. सुधीर कुलकर्णी, संस्थेचे माजी सचिव, सुरेश जोशी, संस्था कार्यकारीणी सदस्य सौ. जोशी यांनी सदिच्छा भेट दिली.
या शिबिरातील सर्वांगीण कामासाठी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून प्रणिती पाटील, रूचि गुप्ता, नितिन करमोडा, योगिता भुवड, कृपेश भोईर यांची निवड करण्यात आली. उपसरपंच अजय पाटील, ग्रामस्थ जयवंत पवार, सचिन पाटील. संदिप सावंत, विशाल पाटील, विश्वास मोहिते यांच्या उपस्थितीत कॅम्प फायरचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरात वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, गटचर्चा, प्रश्नमंजूषा, ‘माझा संकल्प स्पर्धा’ व्यवसाय नियोजन घेण्यात आल्या.

Web Title: Dandekar's students built forest block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.