दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 08:02 PM2016-10-16T20:02:06+5:302016-10-16T20:02:06+5:30

एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला.

Danduka never exposed millions of people in peace | दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 16 - एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही दंडूकेबाजी करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबल पासून ते पोलीस आयुक्तांर्पयत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.
तीन हात नाक्यावर कोपरी, माजीवडा, मुलूंड चेक नाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्हयातील मराठा बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तीन हात नाक्यापासून सकाळी 11 वा. सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थीनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील आरोपींना सहा महिन्यात फाशी देण्यात यावी आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्यांचे फलक आणि भगवे ङोंडे फडकवित हा मुक मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणोरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनिल लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह 3क्क् अधिकारी आणि दोन हजार तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती.
मोर्चामध्ये घोषणाबाजी नसल्याने आणि कोणीही चिथावणीखोर भाषणबाजी करीत नसल्याने या मोर्चाच्या बंदोबस्ताचा तशा अर्थाने ताण वाटला नाही, असे एका अधिका:याने सांगितले. तर मोर्चाच्या शिस्तीबद्दल सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. पोलिसांच्या मदतीला सुमारे तीन हजार स्वयंसेवक उत्स्फुर्तपणो सहभागी झाले होते.
मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीन हात नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे काही मार्ग वाहनांसाठी सकाळी 1क् ते दुपारी 3 वा. र्पयत बंद ठेवण्यात आले होते. नितिन कंपनी ते तीन हा नाक्याकडे जाणारा उड्डाणपूलाचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. तीन हात नाका ते गोखले रोड, मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका, तीन हात नाका ते कोपरी आणि हरिनिवास ते तीन हात नाका हे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपायुक्त संदीप पालवे, सहायक पोलीस आयुक्त बी. आर. गीते, पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह 51 अधिकारी आणि 370 कर्मचारी कार्यरत होते.
.............
अधिकारी पत्रकार यांच्यात किरकोळ वाद
तीन हात नाक्यावरील उड्डाणपूलावरुन मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकार पूलाच्या कठडयावर चढण्याचा प्रय} करीत होते. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच पत्रकार आणि त्यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडविला.

मोर्चानंतर घरी परतणारे मराठा बांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग मोर्चानंतर अवघ्या दीड ते दोन तासातच रिकामे झाले आणि वाहतूकही सुरुळीत सुरु झाली.

Web Title: Danduka never exposed millions of people in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.