हातगाडी पुरविणाऱ्या दलालांना दणका

By admin | Published: July 12, 2017 02:45 AM2017-07-12T02:45:06+5:302017-07-12T02:45:06+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या.

Dangaka to the brokers offering the wheel | हातगाडी पुरविणाऱ्या दलालांना दणका

हातगाडी पुरविणाऱ्या दलालांना दणका

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या. दलाल प्रत्येक गाडीसाठी प्रतिदिन ३०० रुपये भाडे आकारत होते. या अवैध व्यवसायाविरोधात सुरक्षा विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या दलालांनी मार्केटबाहेर काढल्या आहेत. यामुळे वाहतूककोंडी काही प्रमाणात सुटली असून, व्यापाऱ्यांसह वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. मुख्य प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांनी चुकीचे कामकाज होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फळ मार्केटमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. वाहतूककोंडीची कारणे शोधून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपसचिव सीताराम कावरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले असताना, मार्केटमध्ये हातगाड्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले. याविषयी उपसचिवांनी ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी व इतर घटकांशी चर्चा केली असता, मार्केटमध्ये फक्त ५६ हातगाड्यांना परवानगी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. उर्वरित सर्व अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या होत्या. यामध्ये डब्ल्यू हा शब्द लिहिलेल्या ५०पेक्षा जास्त हातगाड्या होत्या. या गाड्यांचा मालक कुर्ला येथे वास्तव्य करत आहे. मार्केटमधील परप्रांतीय कामगारांना ३०० रुपये प्रतिदिन या दराने तो हातगाडी भाड्याने देत होता. अशाच प्रकारे इतर काही दलाल गाड्या भाड्याने देत होते. रोज जवळपास ५० हजार रुपये भाडे वसूल केले जात होते.
हातगाडीचालक काम झाले की, मार्केटमध्ये जागा मिळेल तेथे गाड्या उभ्या करत होते व त्यांना साखळी व कुलुप लावले जात होते. यामुळे रहदारीसही अडथळा निर्माण होऊ लागला होता. दोन दिवसांपासून या हातगाड्यांविरोधात जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोखंडी गजाने कुलुप तोडून हातगाड्या ताब्यात घेऊन नवीन मार्केटच्या परिसरात नेऊन ठेवल्या आहेत. काही हातगाडीमालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांनी तत्काळ अनधिकृत हातगाड्या मार्केटच्या बाहेर काढून ट्रकमध्ये घालून तेथून घेऊन गेले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे अवैध व्यवसाय करून पैसे कमविणाऱ्यांचा धंदा बंद झाला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल
फळ मार्केटमध्ये सुरक्षा विभागाने २० हातगाड्या जप्त केल्या आहेत. कारवाईच्या भीतीने उर्वरित हातगाड्या दलालांनी मार्केटबाहेर नेल्या आहेत. संजय तळेकर व त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याविषयी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तयार करून, सुरक्षा अधिकारी सी. टी. पवार यांच्यामार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.
सर्व मार्केटमध्ये तपासणी व्हावी
फळ मार्केटमधील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच धर्तीवर कांदा-बटाटा मार्केट, मसाला, धान्य व भाजी मार्केटमध्ये किती हातगाड्या अधिकृत आहेत व किती अनधिकृत आहेत, याविषयी सर्वेक्षण करण्यात यावे व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. अनधिकृतपणे हातगाडी भाड्याने देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Dangaka to the brokers offering the wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.