विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By admin | Published: August 5, 2014 01:08 AM2014-08-05T01:08:16+5:302014-08-05T01:08:16+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा
स्कूल बस, व्हॅन आॅटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी
सुमेध वाघमारे - नागपूर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून ने-आण केली जात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
शहरात ८२२ स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसला स्पीड गव्हर्नर, विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी पुरेशी जागा, चढणे आणि उतरणे सोपे जाण्यासाठी जमिनीपासून ठराविक उंचीवर पायऱ्या, अग्निविरोधक यंत्रणा, संकटकालीन मार्ग, बससाठी पिवळा रंग, सीसीटीव्ही कॅमेरे आदींसह स्कूल बसेसमधून विद्यार्थिनी ये-जा करीत असतील, तर त्या बसमध्ये महिला अटेंडंट असणे आवश्यक आहे. आरटीओ, शहर कार्यालयाच्या वारंवार कारवाईने काही प्रमाणात यातील अनेक बाबी अंमलात आल्या आहेत. परंतु बसमधील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला घेऊन आरटीओसोबत वाहतूक पोलीस गंभीर नसल्याचे चित्र आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याच्या तुलनेत असलेल्या स्कूल बस आणि व्हॅन याकडे कुणाचेच लक्ष नाही. विशेष म्हणजे अमूक आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये नेमके किती विद्यार्थी बसविण्यात यावेत, याबाबतही कुठलाही नियम नाही.