मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यातील खड्डयामुळे दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 12:22 PM2017-09-08T12:22:41+5:302017-09-08T12:39:14+5:30
पनवेल, दि. 8 - मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरीक आपल्या प्राणांना मुकत आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा ...
पनवेल, दि. 8 - मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरीक आपल्या प्राणांना मुकत आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळयाजवळ बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे भाग्यश्री शिंदे या तरुण मुलीचा मृत्यू झाला.
भाग्यश्री तिच्या अवेंजर मोटारसायकलवरुन बांधनवाडी रस्त्यावरुन जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना तिची गाडी स्लीप झाली व ती खाली पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रेलरने तिला चिरडले. भाग्यश्रीचा रक्ताच्या थारोळयात पडलेला मृतदेह पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी तीव्र आंदोलन केले. जवळपास दोन तास या महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.
रस्त्यावरील खड्डयामुळे मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलिसाचा मृत्यू
मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी संतोष एकनाथ शिंदे यांचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे गुरुवारी दुर्देवी मृत्यू झाला. ते 42 वर्षांचे होते. मागच्या आठवडयात गुरुवारी संतोष शिंदे यांच्या दुचाकीचा वाशी गाव सिंग्नल ब्रिजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला होता. ते मुंबईहून नेरुळला चालले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.
रस्त्यावरील खड्डे आणि तेथे असलेल्या अंधारामुळे शिंदे यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.