आव्हाडांवर हक्कभंग!
By admin | Published: July 16, 2015 02:13 AM2015-07-16T02:13:35+5:302015-07-16T02:13:35+5:30
विधानसभा अध्यक्षांबाबत अनुद्गार काढल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाचे राम शिंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांबाबत अनुद्गार काढल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाचे राम शिंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेले दोन दिवस सभागृहात गोंधळाचे वातवरण आहे. त्यातच आ. आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना ‘हिटलर’ची उपमा दिल्याने सत्ताधारी बाकांवरील सदस्य चांगलेच आक्रमक झाले. आ. शिंदे यांनी तर आव्हाड यांच्याविरुद्ध हक्कभंग आणला. आव्हाड म्हणाले, माझे वक्तव्य मी नाकारत नाही; परंतु लोकशाहीचा खून होत असताना ते उघड्या डोळ्यांनी पाहणे जमणार नाही. त्यामुळे हक्कभंगाच्या माध्यमातून फासावर जायला सांगितले तरी मी तयार आहे. ज्या पद्धतीने गेल्या सात महिन्यांपासून सभागृहाचे कामकाज चालू आहे ती पद्धत लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. मी गेली १४ वर्षे सभागृहात आहे. पण अशा पद्धतीचे कामकाज कधीही अनुभवलेले नाही, फक्त आमचाच नाहीतर मीडियाचाही गळा दाबण्याचे काम विधानसभा अध्यक्षांनी केले, असा आरोपही त्यांनी केला.