डेंग्यूची २,७०७ रुग्णांना बाधा

By admin | Published: October 24, 2016 04:50 AM2016-10-24T04:50:06+5:302016-10-24T04:50:06+5:30

गेल्या काही वर्षांत मुंबईत डेंग्यूने ठाण मांडले आहे. २०१३ ते २०१५ या कालावधीत डेंग्यूचे २ हजार ७०७ रुग्ण मुंबईत आढळून आले असून

Dangue hampered 2,707 patients | डेंग्यूची २,७०७ रुग्णांना बाधा

डेंग्यूची २,७०७ रुग्णांना बाधा

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईत डेंग्यूने ठाण मांडले आहे. २०१३ ते २०१५ या कालावधीत डेंग्यूचे २ हजार ७०७ रुग्ण मुंबईत आढळून आले असून, त्यापैकी ३१ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
ई वॉर्डमध्ये गेल्या तीन वर्षांत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.
२०१३मध्ये ई वॉर्डमध्ये डेंग्यूचे १०५ रुग्ण, २०१४मध्ये १३४ आणि २०१५मध्ये १२० रुग्ण आढळून आले होते. २०१३मध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. पण, २०१४मध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाचा ई वॉर्डमध्ये मृत्यू झाला होता.
२०१३मध्ये आर उत्तर वॉर्डमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. तर, पी दक्षिण वॉर्डमध्ये २ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता.
२०१४मध्ये जी उत्तरमध्ये डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळून आले होते. तर, ए आणि के पूर्व वॉर्डमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. २०१५मध्ये ई वॉर्डच्या बरोबरीनेच जी उत्तर वॉर्डमध्येही डेंग्यूचे १२० रुग्ण आढळून आले होते. तर, एम पूर्व वॉर्डमध्ये २ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी काढलेल्या माहितीत उघड झाली आहे.
२०१३मध्ये बी, जी दक्षिण, जी उत्तर, के पूर्व, एल, एन आणि टी वार्ड येथे प्रत्येकी एक असे ७ तर पी दक्षिण आणि एम पूर्व येथे प्रत्येकी दोन असे सर्व मिळून ११ डेंग्यूच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dangue hampered 2,707 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.