दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:43 AM2017-07-29T03:43:43+5:302017-07-29T03:43:48+5:30

सी.बी.एस.ई., तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

dapataraancae-ojhae-kamai-karanayaasaathai-kaendaraiya-mantarayaansai-caracaa-karanaara | दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

Next

मुंबई : सी.बी.एस.ई., तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या विषयावर अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली होती. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासननिर्णय जारी केला, पण याची अंमलबजावणी होत नाही. आजही सी.बी.एस.ई., आय.सी.आय.सी. व इतर बोर्डांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागते, असे ते म्हणाले.
विक्रम काळे, नागो गाणार, नीलम गोºहे, हेमंत टकले आदी सदस्यांनी त्यांचे समर्थन केले. यावर विद्यार्थ्यांच्या हितासाठी जीआर जारी केला. त्यामुळे राज्याच्या बोर्डाच्या शाळांमधील ९४ टक्के ओझे कमी झाले. हे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत वाढले असते, परंतु मुंबई आणि ठाण्यातील काही शाळा सी.बी.एस.ई. आणि आय.सी.आय.सी. बोर्डाच्या निर्णयाची अंमलाजावणी करत नाहीत. त्यामुळे अशा शाळांचे समुपदेशन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, म्हणून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू, असेही तावडे म्हणाले.

Web Title: dapataraancae-ojhae-kamai-karanayaasaathai-kaendaraiya-mantarayaansai-caracaa-karanaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.