VIDEO: तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:02 PM2020-05-27T20:02:37+5:302020-05-27T20:18:54+5:30
कोरोना संकटातही राजकारण सुचतंय; शिवसेना मंत्र्यांची जोरदार टीका
जळगाव: राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यपालांच्या भेटीगाठी यावरून वातावरण तापलं आहे. भाजपा राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. आता शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.
राज्य सरकार पडणार असल्याच्या वावड्या काल-परवापासून उठवल्या जात आहेत. एकीकडे कोरोनासारखं संकट असताना दुसरीकडे अशा चर्चा केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या वावड्या म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोरोना संकटाच्या काळात एकाग्रतेनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.
हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान pic.twitter.com/GzUgRKMDiS
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2020
कोरोनाचं संकट संपल्यानंतर मैदानात येऊया. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सरकार पाडाच, असं थेट आव्हान पाटील यांनी विरोधकांना दिलं. भाजपानं सरकार पाडून दाखवावं. पण त्याआधी सरकार कोरोना संकटात हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना स्वत: किती पुढाकार घेतला, त्याचा विचार विरोधकांनी करावा, असं पाटील म्हणाले. विरोधकांकडून कोरोनाच्या काळातही राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला जनतेनं स्वीकारलं आहे. जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंनी, अजित पवारांनी स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून काही केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारला सल्ले देणाऱ्या फडणवीसांनी तेच सल्ले गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. फडणवीस यांना अधिकाऱ्यांचा लवाजमा मागे पुढे घेऊन फिरण्याची सवय लागली होती. ती सवय सुटल्यानं आता त्यांना करमत नाही. पाण्याविना मासा तडफडतो, तशी फडणवीस यांची सत्तेशिवाय तडफड सुरू आहे. हे सगळं राज्यातील जनता पाहते आहे, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला
"फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"
फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा
विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"