दर्शन पुजारीचे दुहेरी अजिंक्यपद

By admin | Published: June 13, 2016 09:05 PM2016-06-13T21:05:39+5:302016-06-13T21:05:39+5:30

पुण्याच्या दर्शन पुजारीने सांगलीच्या तेजस शिंदेचा २-० असा धुव्वा उडवत पहिल्या महाराष्ट्र सब-ज्युनिअर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेच्या १३ वर्षांखालील एकेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले.

Darshan Pujari's double championship | दर्शन पुजारीचे दुहेरी अजिंक्यपद

दर्शन पुजारीचे दुहेरी अजिंक्यपद

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ : पुण्याच्या दर्शन पुजारीने सांगलीच्या तेजस शिंदेचा २-० असा धुव्वा उडवत पहिल्या महाराष्ट्र सब-ज्युनिअर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेच्या १३ वर्षांखालील एकेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले. तर दुहेरी गटात अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दर्शनने रायगडच्या शैलेश सिंगच्या साथीने विजयाची नोंद करत स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याचा मान पटकावला.
जयेश धुरी बॅडमिंटन फाऊं डेशन आणि बृहन्मुंबई क्रीडा व ललितकला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने मुलूंड पश्चिमेतील कालिदास क्रीडा संकुलात स्पर्धेचे सामने उत्साहात पार पडले.
स्पर्धेत ११ वर्षीय दर्शनने तेजस विरु्दध खेळताना धमाकेदार सरुवात केली. शिस्तबद्ध ेखेळ आणि निवडक फटकेबाजी यांचा योग्य समन्वय साधत दर्शनने सामन्यावर आपली पकड मिळवली. पहिल्या सेटमध्ये तेजसने काहीअंशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र दर्शनपुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेर २१-१५, २१-११ अशा दोन्ही सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत दर्शनने विजय मिळवला.
दुहेरीत दर्शनने शैलेश सिंगच्या साथीने पुण्याच्या अरविदं राव-विवेक हब्बुविरुद्ध खेळण्यास सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या लढतीत दर्शन-शैलेश जोडीने प्रतिस्पर्धी जोडीचा विशिष्ट व्युहरचनेच्या आधारे खेळताना पहिल्या सेटमध्ये २१-१८ असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये देखील दर्शन-शैलेश जोडीने आपला करिष्मा कायम ठेवत २१-१७ अशा विजयाची नोंद केली. (क्रीडा प्रतिनिधी)

अन्य निकाल एकेरी गट
१३ वर्षांखालील मुली:
तारा शाह (पुणे) वि.वि. हिृशा दुबे (बृहन्मुंबई) १७-२१, २१-११, २१-०८.
१५ वर्षांखालील मुली :
सई नांदूरकर (नाशिक) वि.वि. आर्या देशपांडे (सातारा) २१-१६, १९-२१, २१-१५.
१५ वर्षांखालील मुले :
सुधांशू भुरे (नागपूर) वि.वि. रोहन ठूल (ठाणे) १६-२१, २२-२०, २१-०९

दुहेरी गट
१३ वर्षांखालील गट मुली :
रिया हब्बू-साहन्या कुलकर्णी (पुणे) वि.वि. हिृशा दुबे-खुशी कुमारी(बृहन्मुंबई) २५-२३, १८-२१, २१-१४.
१५ वर्षांखालील मुली :
जान्हवी जगताप (मुंबई)-तनिष्का देशपांडे(पुणे) वि.वि. आर्या आंचलवार-लिवीया फर्नांडिस (नागपूर) २१-१२, २१-०६
१५ वर्षांखालील मुले :
राहुल काने-रोहन ठूल (ठाणे) वि.वि. पार्थ घुबे (पुणे)-सुधांशू भुरे(नागपूर)२१-१८, २१-१६.
...............................

Web Title: Darshan Pujari's double championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.