2012 मधील दर्शन शहा हत्या प्रकरण: आरोपी चारू चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 12:47 PM2017-10-10T12:47:15+5:302017-10-10T16:11:50+5:30

2012 साली झालेल्या दर्शन शहा हत्या प्रकरणाचा निकाल अखेरीस मंगळवारी लागला आहे. या हत्येमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Darshan Shah murder case in 2012: Due to double life imprisonment for accused Charu Chandane | 2012 मधील दर्शन शहा हत्या प्रकरण: आरोपी चारू चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

2012 मधील दर्शन शहा हत्या प्रकरण: आरोपी चारू चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

Next

कोल्हापूर-  2012 साली झालेल्या दर्शन शहा हत्या प्रकरणाचा निकाल अखेरीस मंगळवारी लागला आहे. या हत्येमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच एक लाख पाच हजार रूपयांचा दंड कोर्टाने आरोपी चारू चांदणेला ठोठावला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आज, मंगळवारी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतील १ लाख रुपये दर्शनची आई स्मिता शहा यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

कोल्हापुरातील शुश्रुषा नगरातील रोहित आणि स्मिता शहा यांचा मुलगा दर्शन शहा या मुलाची देवकर पाणंद येथे २५ डिसेंबर २०१२ रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर खंडणी म्हणून शहा कुटुंबियांकडं २५ तोळे सोन्याची मागणी केली होती. त्याच दिवशी त्यानं दर्शनची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.  या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी योगेश ऊर्फ चांदणेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. 

मार्च 2013 मध्ये चांदणेवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला.

Web Title: Darshan Shah murder case in 2012: Due to double life imprisonment for accused Charu Chandane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.