दसरा सण मोठा..नाही आनंदाला तोटा..

By admin | Published: October 1, 2014 11:18 PM2014-10-01T23:18:05+5:302014-10-01T23:18:05+5:30

‘दसरा सणाचा दिवस ठरविताना अपराण्ह- काळाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रदोष काळ हा गौणकाळ समजला जातो. म्हणून यावर्षी आश्विन शुक्ल नवमीच्याच दिवशी विजयादशमी-दसरा सण आलेला आहे

Dasara festival is big .. no loss of joy .. | दसरा सण मोठा..नाही आनंदाला तोटा..

दसरा सण मोठा..नाही आनंदाला तोटा..

Next
‘दसरा सणाचा दिवस ठरविताना अपराण्ह- काळाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रदोष काळ हा गौणकाळ समजला जातो. म्हणून यावर्षी आश्विन शुक्ल नवमीच्याच दिवशी विजयादशमी-दसरा सण आलेला आहे. दिनमानाचे पाच समान भाग केल्यावर पहिला भाग प्रात:काळ, दुसरा संगवकाळ, तिसरा मध्यान्हकाळ, चौथा अपराण्हकाळ आणि पाचवा सायंकाळ मानला जातो. यावर्षी शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी आश्विन शुक्ल नवमी सकाळी 9.58 र्पयत आहे. त्यानंतर दशमी सुरू होत आहे.
 सणाची उत्पत्ती
विजयादशमी-दसरा सणाची उत्पत्ती काही कथांच्या आधारे सांगितली जाते.
1. एकदा महिषासूर राक्षसाने पृथ्वीवरील सर्वास त्रस देऊन भंडावून सोडले. त्यावेळी परमेश्वराने अष्टभूजा देवीच्या रुपाने त्या राक्षसाशी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीर्पयत तुंबळ युद्ध करून त्यास ठार मारून विजय मिळविला. त्यावेळी देवीने ‘विजया’ हे नाव धारण केले होते, म्हणून आश्विन शुक्ल दशमीस ‘विजयादशमी’ असे म्हणतात. 
2. प्रभुरामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो हाच दिवस होता.
3. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता म्हणून विराटाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपापली शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली. त्यांनी त्याचवेळी शमीच्या झाडाची आणि शस्त्रची पूजा केली, तो दिवस आश्विन शुक्ल दशमीचाच होता.
4. प्रभूरामचंद्राचा पणजा रघुराजा हा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाला होता.
5. पैठण शहरात कौत्स नावाचा एक मुलगा राहत होता. तो वरतंतू ऋषींकडे वेदाभ्यास करण्यासाठी गेला. काही दिवसांनी कौत्स हा सर्व शास्त्रविद्येत निपुण झाला. ‘शेवटी गुरूदक्षिणा काय द्यावी?’ असा प्रश्न कौत्साने वरतंतू ऋषींना विचारला. वरतंतू ऋषींनी काहीही गुरूदक्षिणा नको, असे सांगितले. परंतु कौत्साचे समाधान झाले नाही. तो वरतंतू गुरूंना गुरूदक्षिणोचा आग्रह करू लागला. कौत्साचा आग्रह पाहून वरतंतू ऋषींनी प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणो चौदा कोटी सुवर्णमुद्रा एकाजवळून आणून द्याव्यात असे सांगितले. त्याप्रमाणो कौत्स सुवर्णमुद्रा मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. परंतु रघुराजाने प्रथम असमर्थता दर्शविली. नंतर त्याने कौत्साकडून तीन दिवसांची मुदत मागून घेतली. रघुराजाने चौदा कोटी सुवर्णमुद्रांसाठी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले. इंद्रास हे समजले. त्याने आपटय़ाच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडविला. नंतर त्या सर्व सुवर्णमुद्रा रघुराजाने कौत्सास दिल्या. कौत्साने सर्व सुवर्णमुद्रा गुरूदक्षिणा म्हणून ठेवा असे सांगितले. वरतंतू ऋषींनी उरलेल्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स परत रघुराजाकडे आला परंतु रघुराजाही त्या परत घेईना! शेवटी कौत्साने त्या उरलेल्या सुवर्णमुद्रा आपटय़ाच्या व शमीच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटण्यास सांगितले. 
- दा. कृ. सोमण
 
सण विजयाचा!
च्दसरा हा सण विजयाचा आहे. हा दिवस पराक्रमाचा आहे. पूर्वी देखील शेतकरी हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करीत असत. हा कृषिविषयक लोकोत्सव आहे. भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह प्रवेशद्वारावर तोरण म्हणून बांधण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या कृषिविषयक सणाला धार्मिक रुप दिले गेले. त्यानंतर त्याला राजकीय स्वरुपही प्राप्त झाले. स्वारी करण्यासाठी सीमोल्लंघन करताना दस:याचा मुहूर्त उत्तम म्हणून मानला जातो. 
च्दक्षिण हिंदुस्तानात विशेषत: म्हैसूरमध्ये हा सण मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. शेतीची कामे संपून धान्य घरात आल्यावर स्वारीवर बाहेर पडण्यासाठी हे दिवस सोईस्करही असतात. मराठेही स्वारीसाठी सीमोल्लंघन करण्यासाठी दस:याचा मुहूर्त शुभ म्हणून मानत असतात. स्वारीसाठी जाणा:या अश्वाची पूजाही विजयादशमी-दस:याच्या दिवशी केली जात असे. या दिवसांत ङोंडूच्या फुलांचा विशेष बहर असतो. म्हणून ङोंडूच्या फुलांची आरास केली जाते.
 
आधुनिक काळात..
1दस:याच्या दिवशी विजयादेवीने महिषासूर या दुष्ट राक्षसाला ठार मारले. आधुनिक काळात आपणच आळस, अस्वच्छता, अज्ञान अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, अनीती, गुंडागिरी या राक्षसांना ठार मारावयाचे आहे. हे राक्षस समाजाला त्रस देत आहेत. म्हणूनच यांच्यापासून समाज मुक्त करावयाचा आहे. 
2विजयादशमी हा सण विजयाचा आहे. पराक्रमाचा आहे. विजय मिळविण्यासाठी आपण सामथ्र्यवान असणो आवश्यक आहे. सध्याचे युग पेंटटचे आहे. स्पर्धेचे आहे. म्हणून मूलभूत संशोधन करून जगात पुढे येणो गरजेचे आहे. 
3इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चात, कमी वेळेत आणि पहिल्या प्रय}ातच मंगळ ग्रहाकडे आपले भारतीय मंगळयान यशस्वीपणो पाठविले. त्यांनी ख:या अर्थाने  विजयादशमी साजरी केली आहे. 
 
संदेश शौर्याचा, दानाचा
(जनसामान्य हे नेहमीच श्रेष्ठ व्यक्तींचे अनुकरण करतात. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात तेच सामान्य लोक करतात.) सामान्य लोकांच्या या मानिसकतेचा विचार करूनच आपल्याकडे सणांची रचना केली आहे. विजयादशमी हा लोकोत्तर पुरु षांचा किंवा देवांचा विजयी पराक्र म स्मरून त्याचे अनुकरण करण्याचा दिवस होय.  
नऊ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर या दिवशी देवी मातेने महिषासुरावर विजय मिळवला. प्रभूरामचंद्रांनी रावणाचा पराभव याच दिवशी केला. अज्ञातवासानंतर पांडवांनी शमी वृक्षावरून आपली शस्त्ने काढली तो हाच दिवस. भारतीय संस्कृती ही मानवतेची आणि वीरतेची पूजक आहे. राक्षसी वृत्तींपासून मानवाचे आणि मानवतेचे रक्षण करायचे असेल तर व्यक्ती-व्यक्तीत शौर्य, वीरता, पराक्र म जागले पाहिजेत. नवरात्नाचा जागर हा त्यासाठीच असतो. या शौर्याचा उत-मात येऊ नये म्हणून त्याला देवीच्या भक्तीची आणि वात्सल्याची जोड दिली आहे.  तथापि आज हा हेतू विसरून आपल्या सर्वच उत्सवांचे ‘इव्हेंट्स’ होऊ लागले आहेत. त्यात शौर्य-धैर्याचा मूळ हेतू हरवला जातो आहे. अर्थात इकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे.? केवळ नाच,गाणी, गरबा यातच आम्ही रमून आणि त्यामुळे दमून गेलो आहोत.
दसरा हा पावसाळा संपून सुगीचे दिवस सुरु  होण्याचा काळ आला आहे याची चाहूल देतो.  शेतातून पिके घरात आलेली आहेत आणि घर धन-धान्याने समृद्ध आहे. अशा भरल्या पोटी भक्ती आणि शक्ती जागृत करायला हवी. व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात वीरता प्रगटावी म्हणून हा उत्सव आहे. शत्न सातत्याने कुरापती काढत असेल आणि युद्धाला पर्याय नसेल,  तर शत्नूच्या पुढाकाराची वाट न बघता आपणच शत्नूवर हल्ला करणो ही कुशल राजनीती होय. त्यासाठी शस्त्नांचे पूजन आणि धार करून, घर-शेत-गाव या सगळ्य़ा सीमांचे उल्लंघन करीत, विजय मिळवण्याच्या निश्चयाने शत्नूला भिडणो म्हणजे विजयादशमी. रोग आणि शत्नू उत्पन्न होताच त्यांचा नायनाट केला पाहिजे. एकदा त्यांनी आपले हातपाय पसरले तर ते खूप नुकसान करतात.  त्यांना आवरणोही कठीण जाते. अर्थात यासाठी सावधानता आणि दक्षता हे दोन गुण आवश्यक आहेत. बेसावध सावज हे सहज शिकार बनू शकते. हल्ला झाल्यावर शस्त्ने शोधत बसण्याची वेळ आली तर पराभव निश्चीतच होणार.    सामान्य माणसासाठी दसरा म्हणजे स्वत:च्या दहा मानिसक रिपुंवर विजय मिळवण्याची संधी. काम,  क्र ोध, मद, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ, अन्याय, क्रूरता आणि अहंकार हे ते दहा रिपू होत. कुटुंब आणि समाज यांच्या भल्यासाठी त्यांचे निर्दालन करणो उपयुक्त आहेच; पण चारित्र्य, प्रतिष्ठा, मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांच्या रूपाने या विजयाचा सर्वात जास्त फायदा मिळतो तो त्या व्यक्तीलाच! आपल्या दुर्गुणांच्या सीमांचे उल्लंघन करून दैवी संपत गुण प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध व्हायला विजयादशमी इतका उत्तम मुहूर्त नाही. आपल्या सर्व सणवारांत आपल्याला देण्यात येणारी आणखी एक मोठी शिकवण म्हणजे दान. कलियुगातील गुन्हेगारीपासून ते प्रदूषणापर्यंत सगळ्य़ा समस्यांचे कारण माणसाच्या लोभी आणि संग्रही वृत्तीत दडले आहे. ‘दान’ हा त्यावर उत्तम उतारा आहे. कुबेराने आपटय़ाच्या झाडावर मोहोरांचा पाऊस पाडला तरी रघुराजाने त्याच्या गरजेइतक्या म्हणजे फक्त 14 कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या. बाकी मुद्रा लोकांनी घेऊन जाव्यात असे त्याने सांगितले. तेव्हापासून आपण दस:याला आपटय़ाची पाने एकमेकांना ‘सोने’ म्हणून देतो. खरेतर ‘सोने लुटणो’ यातील अभिप्रेत अर्थ ‘आपल्या गरजेपेक्षा आपल्याकडे असलेले जास्तीचे धन, गरजू, दरिद्री लोकांना दान देणो’ असा 
आहे.  
 - डॉ.सच्चिदानंद शेवडे 
 
युद्ध्यन्तेपशव: सर्वे, पठन्ती शुकसारिका: 
दातुंजानाति यो वित्तंस शूर: स च पिण्डत: 77
च्[सर्व प्राणी युद्ध करतात (याला शौर्य म्हणत नाहीत.) पोपट आणि मैना पठण करतात. (यात पांडित्य नाही.) जो दान करणो जाणतो तोच शूर, तोच पंडित होय.
च्दीपावलीच्या तोंडावरच विजयादशमी येते. आपल्या प्रत्येक सणामागे काही हेतू आहे, संदेश आहे. आपण तो विसरत चाललो आहोत. गतानुगतिकतेने केवळ सण साजरे करतो. यामुळे नुकसान आपलेच होणार आहे. 

 

Web Title: Dasara festival is big .. no loss of joy ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.