Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 03:43 PM2022-09-29T15:43:16+5:302022-09-29T15:44:11+5:30

PFI च्या मुद्द्यावरूनही उद्धव यांना सुनावलं...

Dasara Melava at Shivtirtha Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale slammed Uddhav Thackeray Shivsena | Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Next

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: महाराष्ट्रात दसरा मेळाव्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या असताना, देशपातळीवर मात्र PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा विषय गाजतोय. छापे, धाडी आणि अटक सत्रानंतर अखेर केंद्र सरकारने PFI आणि त्याच्याशी संबंधित ८ संघटनांवर बंदी घातली. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपामुळे केंद्र सरकारने PFI वर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. PFI चे जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशीही संबंध आहेत असे अधिसूचनेत म्हटले आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमकपणे बोलतात, पण PFI बद्दल त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत मत व्यक्त करण्यात आल्यावरून मनसेने त्यांना टोला लगावला.

शिवसेनेच्या शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला जरी उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली असली तरी शिवसेनेत दोन गट पडल्याने गर्दी जमवणे व शक्तीप्रदर्शन करणे क्रमप्राप्तच आहे. अशा वेळी एका वृत्तानुसार, काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनात शिवसैनिकांनी सहभागी झाल्यास, दसरा मेळाव्याला काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावरून मनसेचे गजानन काळे यांनी टीका केली आहे.

"नवाब सेनेचा 'टोमणे मेळावा' काँग्रेसच्या जीवावर होणार तर ... बुडत्याला काडीचा आधार ... तरी म्हटलं नवाब सेनाप्रमुख, छोटे नवाब व त्यांच्या सेनेकडून 'पीएफआय'बाबत अधिकृत वक्तव्य अजून का नाही आले ते ... हिरवी मशाल घेवून टोमणे मेळावा होणार तर ...", असा खोचक टोला मनसेचे गजानन काळे यांनी लगावला आहे. मनसे गेल्या काही महिन्यांपासून प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आक्रमक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबद्दल जाहीर आवाज उठवला. ते आंदोलन यशस्वी झाल्याचेही त्यांनी त्यानंतरच्या सभांमध्ये सांगितले. तसेच, PFI वर केंद्र सरकारने कारवाई केल्यानंतर राज यांनी जाहीरपणे गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले.

Web Title: Dasara Melava at Shivtirtha Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale slammed Uddhav Thackeray Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.