जातीपातीचे सिमोल्लंघन करणारा दसरा
By admin | Published: October 10, 2016 03:25 PM2016-10-10T15:25:10+5:302016-10-10T15:25:10+5:30
मागासवर्गीय महिलांना असतो श्रींच्या आरतीचा पहिला मान वडवळ-महेश कोटीवाले दसरा हा साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असलेला सण
ऑनलाइन लोकमत
वडवळ, दि.10 - मागासवर्गीय महिलांना असतो श्रींच्या आरतीचा पहिला मान वडवळ-महेश कोटीवाले दसरा हा साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असलेला सण ..सर्वत्र विजयादशमी म्हणून हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. वडवळ (ता मोहोळ) येथे असाच जातीपातीचे सिमोलनघंन करणारा दसरा हा सण १२ व्या शतकपासून साजरा केला जात आहे याला प्राचीन परंपरा आहे
श्री नागनाथांची पालखी सिमोलंघनास आल्यानंतर आरती करण्याचा पहिला मान हा येथील मागासवर्गीय समाजाच्या महिलांना आहे या समाजातील महिला दसरा या दिवशी दिवसभर उपवास करतात रात्रि उशिरा श्री ची पालखी मारुती मंदिराजवळ आल्यानंतर त्या विविध प्रकारचा नैवैद्य दाखवतात मग आपला उपवास सोडतात ही प्रथा १२ व्या शतकापासून चालत आली असून सर्व जाती धर्माच्या लोकांना या नागेश संप्रदाय मधे सामावून घेतले असल्याचे मानकरी नागनाथ धनवे पाटिल,हनुमंत मोरे पाटिल,महादेव धनवे पाटिल,सखाराम मोरे पाटिल,मथुराबाई बनसोडे,केराप्पा बनसोडे,किसन बनसोडे, जालिंदर बनसोडे यांनी सांगितले.
असा होतो येथील दसरा साजरा
दसऱ्या दिवशी सर्वत्र आकर्षक विद्युत् रोषणाई केलि जाते रांगोळी च्या पायघड्या घातल्या जातात मागासवर्गीय समाजातील पुरुष मंडळी" मुंगीचा धोंडा"येथे आपट्याची पाने आणून ठेवतात सायंकाळी धनवे व मोरे पाटील घराण्यातील पुरुष मंडळी हातात तलवार(शस्त्र)घेवून नागनाथ मंदिर येथून मुंगीचा धोंडा येथे येतात तिथे शस्त्रपूजन केल्यानंतर प्रतिनिधिक सोने लुटले जाते त्यानंतर सर्व जण नागनाथ मंदिरात जावून श्रींच्या चरणी सोने (आपट्याची पाने)अर्पण करतात मग सर्व जण एकमेकांना सोने देवून शुभेच्छा देतात रात्रि 9 च्या सुमारास मंदिरातील श्रींची मोठी मूर्ति पालखित बसवून संत मंडळी व ग्रामस्थ समवेत भजन करीत सिमोलंघनसाठी पालखी बाहेर येते मुंगीचा धोंडा येथून पा लखि मारुती मंदिराजवळ आल्यावर मागासवर्गीय समाजातील महिला प्रथम आरती करुण नैवैद्य दाखवतत त्यानंतर इतर समाजातील लोक आरती करतात.
नागेश संप्रदाय हा सर्व जाती धर्माण सोबत घेवून जाणारा पंथ आहे श्री नागनाथ महाराजांनीच ही प्रथा १२ व्या शतकात सुरु केलि आहे तीच परंपरा आज ही जतन केलि जात आहे मागासवर्गीय समाजाला प्रथम आरतीचा मान म्हणजे देवाला सर्व भक्त समान च आहेत हा संदेश देणारा सण म्हणजे दसरा होय"
- महादेव धनवे-पाटील
- मानकरी वडवळ