दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी'

By admin | Published: August 25, 2016 10:34 AM2016-08-25T10:34:00+5:302016-08-25T11:30:46+5:30

दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नियम गोविंदा मंडळांनी पायदळी तुडवल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.

Dashihandi's 20 feet height is 'Ashishi Taishi' | दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी'

दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी'

Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २५ - दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा आणि बालगोविंदांना बंदीचा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र हा नियम गोविंदा मंडळांनी पायदळी तुडवल्याचे चित्र राज्यभरात दिसत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व नियम पायदळी तुडवत ठाण्यात ४० फूटांवर दहीहंडी बांधली आहे. नौपाडा येथे रचलेल्या या हंडीला 'कायदाभंग' असं नाव देण्यात आले असून ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेने ११ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पारंपरिक पद्धतीनेच नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. 
(थरार की निर्बंध?)
  •  
दरम्यान डोंबिवलीतही न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून डोंबिवलीतील नव साई गोविंदा पथकाने  ५ थरांचा मनोरा रचत २० फूटांपेक्षा जास्त सलामी दिली.
तसेच गोरेगाव येथील गावदेवी महिला गोविंदा पथकाकडून ५ थर लावण्यात आले असून त्यांनी उंची व वयाची मर्यादा या दोन्हींचाही भंग केला आहे.
 
दादरमध्ये गोविंदा पथकाने झोपून नऊ थर रचले
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ दादरमध्ये कोकण नगर या गोविंदा मंडळाने जमिनीवर झोपून ९ थर लावत न्यायालयाच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध केला. कोकणनगर मंडळाने याठिकाणी झोपून नऊ थर लावले. दादर पश्चिमेला स्थानकाच्या परिसरात गेली ५० वर्षे हंडी उभारण्याची परंपरा आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक नावाजलेली पथके हजेरी लावतात. कोकणनगर हेदेखील याच मंडळांपैकी एक आहे. मुंबईतील जुन्या गोविंदा पथकांपैकी एक म्हणून कोकणनगर मंडळाची ओळख आहे. गेल्या काही वर्षात हमखास आठ थर लावणारे पथक म्हणून या मंडळाने ओळख निर्माण केली होती. मात्र, यंदा न्यायालयाच्या २० फुटांच्या मर्यादेमुळे कोकणनगर गोविंदा पथकाला चारपेक्षा जास्त थर रचता येणार नाहीत. त्यामुळेच या नाराज मंडळाने प्रतिकात्मक निषेध नोंदवला, 
 
 
 
 

Mumbai: After SC order of 20 ft cap for human pyramids,'Govindas' in Dadar make a 20+ ft pyramid lying on ground pic.twitter.com/VbpGlzeqiN

— ANI (@ANI_news) August 25, 2016 nt-family: itf_devanagarimediumfont; line-height: 26px;">
 
मुळात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निमयांचे पालन होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय समित्या स्थापन केलेल्या नाहीत. त्यामुळे उत्सवात नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी कोण करणार? याबाबत संभ्रम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पथकांकडून रचल्या जाणाऱ्या थरांचे चित्रीकरण करून त्यात दोषी आढळणाऱ्या गोविंदावर कारवाई केली जाईल. मात्र, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात शेकडो आयोजक असून, हजारो गोविंदा पथकांमधून लाखो गोविंदा उत्सवात सामील होतात. त्यांचे चित्रीकरण कसे करणार? आणि इतक्या मोठ्या संख्येवर कारवाई कशी होणार? हे प्रश्न अद्यापही निरुत्तरीतच आहेत.
 

 

 

 

 

Web Title: Dashihandi's 20 feet height is 'Ashishi Taishi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.