तारीख बदलली, 8 मार्चला ठरणार मुंबईचा महापौर
By admin | Published: March 1, 2017 08:37 PM2017-03-01T20:37:28+5:302017-03-01T20:37:28+5:30
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी होणा-या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी होणा-या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. 8 मार्चला महापौरांची निवड केली जाणार आहे. यापुर्वी 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक होणार होती मात्र, महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तारीख बदलण्यात आली आहे.
महापौरपदासाठी उमेदवारीचा अर्ज 4 मार्च रोजी भरता येणार आहे. तर निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 8 मार्च काही तास आधी अर्ज मागे घेता येणार आहे. 2012 साली निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी ते तांत्रिकदृष्ट्या पदावर असतील. मात्र, त्यांना या निवडणुकीत भाग घेता येणार नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7, एमआयएम 3 तर समाजवादी पक्ष 6 आणि अखिल भारतीय सेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेना जरी एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आला असला तरी मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाला असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.