MPSC Exam postponed : 'एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 03:42 PM2021-03-11T15:42:37+5:302021-03-11T15:45:36+5:30

Date by date! The MPSC exam on March 14 has been postponed once again : एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी..

Date by date! The MPSC exam on March 14 has been postponed once again | MPSC Exam postponed : 'एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

MPSC Exam postponed : 'एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

Next

पुणे : येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची MPSC Exam पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोना संकटामुळे मागील वर्षभरात जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक पातळीवर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तसेच एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र, १४ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा कायम राहिली आहे. 


पहिल्यांदा २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर एमपीएससी नेच जाहीर करण्यात आलेली ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाले दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे. 
 

Web Title: Date by date! The MPSC exam on March 14 has been postponed once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.