राज्य शासनाचे तारीख पे तारीख
By admin | Published: December 19, 2014 12:51 AM2014-12-19T00:51:37+5:302014-12-19T00:51:37+5:30
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यावर उत्तर सादर करण्यासाठी राज्य शासन तारीख पे तारीख घेत आहे. हायकोर्टाने बुधवारी एक दिवस वाढवून दिल्यानंतर शासनाने आज (गुरुवारी) पुन्हा एक
जिल्हा बँक घोटाळा : सुनील केदार प्रतिवादी
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यावर उत्तर सादर करण्यासाठी राज्य शासन तारीख पे तारीख घेत आहे. हायकोर्टाने बुधवारी एक दिवस वाढवून दिल्यानंतर शासनाने आज (गुरुवारी) पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ मागितली. यामुळे उद्या (शुक्रवारी) शासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही शासनाने अनेकदा वेळ घेतली आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार व इतर आरोपींकडून घोटाळ्याची रक्कम व व्याज पकडून १५६ कोटी रुपये वसुल करण्यासाठी बडेगाव (सावनेर) येथील शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. २००१-२००२ मध्ये सुनील केदार अध्यक्ष व अशोक चौधरी महाव्यवस्थापक असताना बँकेत घोटाळा झाला. बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. कोलकाता, सेंचुरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. परंतु, कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही.
विशेष लेखापरीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे लेखापरीक्षण करून २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून केदार, चौधरी व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)