पोलादपूर मध्ये दत्त कृपा धाब्यावर दरड कोसळून १ ठार
By admin | Published: August 2, 2016 03:31 PM2016-08-02T15:31:24+5:302016-08-02T15:56:02+5:30
पोलादपूर मधील कशेडी घाट प्रारंभा जवळच्या चोळई गावांतील श्री दत्त प्रसाद ढाब्यावर दरड कोसळून ढाब्याचे मालक उदय चिकणो ठार झाले
Next
>जयंत धुळप
ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. २ - पोलादपूर मधील कशेडी घाट प्रारंभा जवळच्या चोळई गावांतील श्री दत्त प्रसाद ढाब्यावर दरड कोसळून ढाब्याचे मालक उदय चिकणो ठार झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सुत्रंनी दिली आहे.
गेल्या चोविस तासात महाबळेश्वर मध्ये 319 मिमी तर महाबळेश्वच्या पायथ्याशीच असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे 256 मिमी तर महाड येथे 230 मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या सावित्री नदिने महाड मध्ये धोकादायक जलपातळी ओलांडून पूराचे पाणी महाड बाजारपेठ व परिसरात घुसले आहे.
समुद्र भरतीमूळे जलपातळीत खाली येण्यास विलंब
महाबळेश्वर सह पोलादपूर व महाड मध्ये संततधार पाऊस सुरच असल्याने सावित्रि नदिची जल पातळी सातत्याने वाढत आहे. सावित्री नदिची धोकादायक पूर पातळी 6.50 मिटर असून सद्यस्थितीत सावित्रीची प्रत्यक्ष जलपातळी महाड येथे 6.30 मिटर झाली आहे. मंगळवारी अमावास्या असून समुद्रास पूर्ण भरती 11.15 वाजता होती त्यामूळे पश्चिम वाहीनी नद्यांच्या पूराच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे वेगाने होवू शकत नव्हता. ओहोटी सुरु झाल्यावर नद्यांची जलपातळी कमी येवू शकेल असा अंदाज महाड-पोलादपूरच्या पूर्वीच्या पूरापत्तीत मदत कार्यकेलेले अनूभवी एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
सावित्री नदीबरोबरच जिल्ह्यातील उवर्रित नद्यांच्या जलपातळीत वाढ
महाडमधील सावित्री नदि बरोबरच जिल्ह्यातील उवर्रित नद्यांच्या जलपातळीत देखील विक्रमी वाढ झाली आहे. अंबा नदिची नागोठणे येथे जलपातळी 6 मिटर (धोकादायक पूर पातळी 9 मि.) झाली आहे. कुंडलिका नदिची डोलवहाळ येते जलपातळी 23 मिटर (धोकादायक पूर पातळी 23.95मि.) झाली आहे. पाताळगंगा नदिची लोहोप येथे जलपातळी 18.92 मिटर (धोकादायक पूर पातळी 21.52मि.) झाली आहे. उल्हास नदिची कजर्त येथे जलपातळी 43 मिटर (धोकादायक पूर पातळी 48.77मि.) झाली आहे. गाढी नदिची पनवेल येथे जलपातळी 3 मिटर (धोकादायक पूर पातळी 6.55मि.) झाली आहे.
भिरा धरणाचे तिन दरवाजे 0.25 सेमी उघडले, 83.20 क्युसेक्स जल विसर्ग सूरु
भिरा धरण क्षेत्रत गेल्या चोविस तासात 149.40 मिमी पाऊस झाला तर यंदाच्या पावसाळ्य़ात मंगळवारी सकाळी आठ वाजे र्पयत येथे एकुण 2842.2क् मिमी पाऊस झाल्याने भिरा पिकअप धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील जलपातळी धोक्याच्या खाली राखण्याकरीता धरणाचे तिनही दरवाजे क्.25 सेमी उघडण्यात आले असून त्यांतून सद्यस्थितीत 83.2क् क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. या जलविसर्गामूळे कुंडलिका नदीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. परिणामी रोहा अष्टमी पूलास कुंडलिका नदिचे पाणी पोहोचले आहे. रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती नियंत्रणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पजर्न्यमान
पोलादपूर-256 मि.मि.,महाड-230 मि.मि., मुरु ड-122 मि.मि., कर्जत-96.80 मि.मि., पेण-64 मि.मि.,अलिबाग-63 मि.मि., पनवेल43.20 मि.मि., उरण-32 मि.मि., खालापूर-74 मि.मि., माणगांव-194 मि.मि., रोहा-142 मि.मि., सुधागड पाली-129 मि.मि., तळा-140 मि.मि., म्हसळा-181.60 मि.मि., श्रीवर्धन-133 मि.मि., माथेरान-43 मि.मि. जिल्ह्यात एकूण 1943.6मि.मि.पाऊस पडला असून हे सरासरी पजर्न्यमान 121.48 मि.मि. आहे.