दत्ता मेघे यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश
By admin | Published: July 6, 2014 01:08 AM2014-07-06T01:08:30+5:302014-07-06T01:08:30+5:30
येत्या काळात या दोन्ही मार्गाचे काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.
Next
वर्धा : बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.
वर्धा शहराजवळील सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलात आयोजित मेळाव्यात ते बोलत होत़े याप्रसंगी माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, समीर मेघे यांनी समर्थकांसह गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. गडकरी म्हणाले, विदर्भ विकासाला गती मिळावी. विदर्भात उद्योग उभे राहिले पाहिजे.
आपल्या विभागातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावायचे आहे. देशाचे महत्त्वाचे खाते आपणाकडे असून रेल्वे बोर्ड, विमान वाहतूक, रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे.
यामुळे देशाच्या 4क् टक्के बजेटची खाती आपणाकडे आली आहे. यामाध्यमातून विदर्भातील विकासाला चालना देण्याचे काम पुढील काळात होईल. माजी खासदार दत्ता मेघे यांनी विदर्भाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगून पक्षाकडे कोणतीही अपेक्षा नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)