बळीराजांच्या लेकींचे नानाने केले कन्यादान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2016 02:32 AM2016-01-07T02:32:48+5:302016-01-07T02:32:48+5:30

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले.

The daughter-in-law took the daughter-in-law! | बळीराजांच्या लेकींचे नानाने केले कन्यादान!

बळीराजांच्या लेकींचे नानाने केले कन्यादान!

googlenewsNext

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. नाम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भावाची भूमिका निभावली. लग्नसोहळ्यात मी पित्याच्या, तर मकरंद भावाच्या भूमिकेत आहे. एकाचवेळी इतक्या मुली आणि जावई मिळाले यापेक्षा भाग्याचा क्षण कोणता, असे भावूक उद्गार नानाने काढले.
आत्महत्याग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या २३ मुलींच्या डोक्यावर दहा हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत नाना आणि मकरंद यांनी अक्षता टाकल्या. लग्नात वधू-वरांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपयांची भांडी भेट म्हणून देण्यात आली.
नाम फाऊंडेशनने बीड तालुक्यातील लोळदगाव दत्तक
घेतले आहे. या गावात पाणलोटचे सर्वात मोठे काम लोकसहभागातून
उभे करण्यात आले आहे. या
कामाची पाहणीही नाना आणि
मकरंद यांनी केली. या वेळी ३४ शालेय मुलींना सायकलींचे वाटपही करण्यात आले.

Web Title: The daughter-in-law took the daughter-in-law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.