मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

By admin | Published: May 1, 2017 02:27 AM2017-05-01T02:27:13+5:302017-05-01T02:27:13+5:30

विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Daughter's wedding; Father's suicide | मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

Next

पाईट : विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, अशी गावामध्ये कुजबुज आहे. याबाबत खेड पोलीस चौकीमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
विऱ्हाम येथील मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांनी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत गणपत चिमाजी सावंत (रा. विऱ्हाम, ता. खेड) यांनी खेड पोलीस चौकीत खबर दिली.
याबाबत ठाणे अंमलदार एस. एन. नाडेकर यांनी माहिती देताना सांगितले, की ते व त्यांच्या कुटुंबातीलइतर राजगुरुनगर येथे लग्नासाठी आलेले असताना गावातील माजी उपसरपंच सिद्धार्थ रोकडे यांनी फोन करून तुमचा भाऊ मारुती सावंत याने तुमच्या शेतात मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ते त्वरित गावाला जाऊन पाहिले
असता भावाने शेतातील मोहाच्या झाडाला दोरी गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. याबाबत मृताच्या आसपास इतर काहीही आढळून
आले नाही.
मृत मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांना ८ मुली असून त्यामधील ५ नंबरच्या मुलीचे लग्न गुरुवारी (दि. ४ मे) गावामधील एका विवाह सोहळ्यामध्ये करण्याचे ठरले होते. लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना वडिलांनी आत्महत्या केल्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, असा नात्यातील व गावामधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मारुती सावंत यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्यावर भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्याकडून मार्चअखेर परतफेड झाली नसल्याचे समजते. कर्जफेडीची विवंचना व डोक्यावर आलेले मुलीचे लग्न यांच्यामुळेच भावकीतील लग्नाला सर्व गेल्याने घरी कोणी नसताना आत्महत्या केली.
या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हवालदार बी. एल. गिरजे अधिक तपास
करीत आहेत.

Web Title: Daughter's wedding; Father's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.