चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं केली पत्नीमुलाची निर्घृण हत्या

By Admin | Published: July 10, 2017 10:54 AM2017-07-10T10:54:36+5:302017-07-10T10:54:36+5:30

चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नी व मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पुण्यामधील हा धक्कादायक प्रकार आहे.

Daughter's wife murdered by her husband on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं केली पत्नीमुलाची निर्घृण हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं केली पत्नीमुलाची निर्घृण हत्या

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नी व मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मावळ तालुक्यातील कान्हे गावातील ही धक्कादायक घटना आहे.   तसंच मुलगी व आणखी एका व्यक्तीवरदेखील धारदार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. याप्रकरणी आरोपी वसंत सातकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.    
 
रविवारी ( 9 जुलै )  मध्यरात्री ही घटना घडली. मृतांची नावं रजनी सातकर ( वय 38 वर्ष) व अनुष सातकर ( वय 13 वर्ष ) अशी आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी वसंत सातकरला ताब्यात घेतले आहे.  
 
अनैतिक संबंधांच्या संशयावरुन वसंत सातकरनं आपल्या पत्नीमुलाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मुलगी श्रावणी व आणखी एकावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. जखमी श्रावणीवर तळेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.  याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 
आणखी बातम्या वाचा 
(दलित मुलींना मंदिरप्रवेश न देणा-या पुजा-यासहीत 3 जणांविरोधात गुन्हा)
("शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत")
(नागपूर वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह)
 

Web Title: Daughter's wife murdered by her husband on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.