पाकिस्तानमधून दाऊदने दिल्या भाच्याला लग्नाच्या शुभेच्छा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 09:59 AM2016-08-18T09:59:14+5:302016-08-18T10:02:36+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशहा पारकरचा बुधवारी सकाळी मुंबईतील नागपाडा भागात पारंपारिक मुस्लिम रिवाजानुसार विवाहसोहळा पार पडला

Dawood has given a wish to marry his brother from Pakistan? | पाकिस्तानमधून दाऊदने दिल्या भाच्याला लग्नाच्या शुभेच्छा ?

पाकिस्तानमधून दाऊदने दिल्या भाच्याला लग्नाच्या शुभेच्छा ?

googlenewsNext
- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशहा पारकरचा बुधवारी सकाळी मुंबईतील नागपाडा भागात पारंपारिक मुस्लिम रिवाजानुसार विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात दाऊद इब्राहिमदेखील स्काईपच्या (ऑनलाइन व्हिडीओ चॅटिंग सर्व्हिस)  माध्यमातून हजर होता का ? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. 
 
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधून अलीशहा पारकरच्या एका नातेवाईकाने ऑडिओ मेसेज पाठवत शुभेच्छा दिल्या होत्या. हा नातेवाईक दुसरा कोणी नसून दाऊद इब्राहिम असल्याचा पोलिसांनी संशय आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा ऑडिओ मेसेज नंतर डिलीट करण्यात आला.
 
जे जे रुग्णालयाजवळ असणा-या रसूल मस्जिदमध्ये हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. जवळपास दीड तास चाललेल्या या विवाहसोहळयाला १०० कुटुंबिय उपस्थित होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विवाहस्थळी जमले होते मात्र त्यांना दूर ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. अलीशहा दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे. आयशा मुंबईतील व्यावसायिकाची मुलगी आहे. 
 
अलिशहाचा मोठा भाऊ दानिशचा २००६ साली रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्याची बहिण उमायराचा मे २०१५ मध्ये विवाह झाला.  
 

Web Title: Dawood has given a wish to marry his brother from Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.