महाक्षमापना दिन नाशिकमध्ये

By admin | Published: September 18, 2016 04:37 AM2016-09-18T04:37:53+5:302016-09-18T04:37:53+5:30

गीताद्वारे उपस्थित शेकडो जैन बांधवांनी एकमेकांना ‘क्षमाबंध’ बांधून महाक्षमापना दिन धर्मगुरूंच्या समवेत साजरा केला.

Day of excitement in Nashik | महाक्षमापना दिन नाशिकमध्ये

महाक्षमापना दिन नाशिकमध्ये

Next


नाशिक : ‘क्षमा की रुत हैं आयी, मन से कर लो सफाई...’ या गीताद्वारे उपस्थित शेकडो जैन बांधवांनी एकमेकांना ‘क्षमाबंध’ बांधून महाक्षमापना दिन धर्मगुरूंच्या समवेत साजरा केला. यावेळी महाक्षमापना दिन राष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रांवर नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या. शहरातील नवकार ग्रुप व जैन सेवा संघ, मोहनलाल चोपडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाक्षमापना दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर रत्नसेन सुरिश्वरजी महाराज, गणिनी आर्यिका शुभमती माताजी, आर्यिका स्वास्तिमतिजी, आर्यिका सुगंधमतिजी, संभवमतिजी, शाश्वतमतिजी, डॉ. अनुपमाजी, दर्शनप्रभाजी, जिनेश्वराजी, स्नेहाप्रभाजी आदि धर्मगुरू साधू-साध्वी मंचावर उपस्थित होते. जैन समाजाच्या तीनही पंथांच्या धर्मगुरूं ची उपस्थिती हे या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. गायक राजीव जैन यांनी नवकार मंत्राचे सुमधुर गायन केले. जैन धर्म हा व्यक्तीनिष्ठ नसून धर्म, अहिंसा व मानवतेची शिकवण देतो. असे मत रत्नसेन महाराज यांनी प्रवचनातून व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Day of excitement in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.