उद्धाटनाच्या दिवशीच नाफेडच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 03:56 PM2016-11-10T15:56:36+5:302016-11-10T15:56:36+5:30

मानोेरा येथील बाजार समितीमध्ये १० नोव्हेंबर रोजी शेतक-यांच्या मागणीवरुन सुरु करण्यात आलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतक-यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

On the day of inauguration, Shukshukkat at Nafed's shopping center | उद्धाटनाच्या दिवशीच नाफेडच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट

उद्धाटनाच्या दिवशीच नाफेडच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट

Next

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 10 - मानोरा येथील बाजार समितीमध्ये १० नोव्हेंबर रोजी शेतक-यांच्या मागणीवरुन सुरु करण्यात आलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतक-यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

 येथील बाजार समितीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी व्यापा-यांकडून होत होती. याबाबत तहसीलदार शेख यांनी दखल घेवून नाफेडची खरेदी केंद्र येथे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी नाफेडच्या खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. मात्र शेतक-यांनी या खरेदी केंद्रावर आपले सोयाबीनचं विक्रीसाठी आणले नाही. त्यामुळे येथे शुकशुकटाट दिसून आला. शासनाने २७५० रुपये सोयाबीनचा हमी भाव ठरविला आहे मात्र बाजार समिती यार्डवर येथील व्यापारी २००० ते २४०० रुपये दरानेच खरेदी करतांना आढळले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते, याची दखल जिल्हाधिकारी दखल घेवून येथे नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्यात. आज केंद्राचे उदघाटन करण्यात आले . यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी माळकर, नायब तहसीलदार गाठेकर, नाफेड अधिकारी उपस्थित होते. मात्र शेतकरीचं आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. नाफेड केंद्रावर ताबडतोब पैसे मिळणार की नाही या संभ्रमात शेतकरी असल्याने त्यांनी खासगी व्यापाºयांकडे माल विकल्याची चर्चा बाजारसमितीत दिसून आली.

Web Title: On the day of inauguration, Shukshukkat at Nafed's shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.