Maharashtra Politics: “आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:26 PM2022-11-15T17:26:03+5:302022-11-15T17:28:22+5:30

Maharashtra News: शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

dcm devendra fadnavis claims that for only four seats shiv sena break alliance with bjp | Maharashtra Politics: “आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Maharashtra Politics: “आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Next

Maharashtra Politics: एकीकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित शाह यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले. अमित शाहंच्या विचारात प्रगल्भता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे. महाराष्ट्रात झालेला बदल तुम्ही पाहिला आहे. शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली

२०१४ साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. ११७ ते ११८ जागा लढणाऱ्या भाजपने २८८ जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

दरम्यान, पक्षासाठी समर्पित नेतृत्व अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते. पक्ष मजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. अमित शाह एका दिवसात ४०-४० बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपचे सरकार आले, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dcm devendra fadnavis claims that for only four seats shiv sena break alliance with bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.