Maharashtra Politics: नाथाभाऊंच्या भाजपवापसीवर फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला त्याबाबत...”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:23 PM2022-09-24T14:23:09+5:302022-09-24T14:24:56+5:30

Maharashtra News: भाजप नेते अमित शाहांशी झालेल्या चर्चेनंतर एकनाथ खडसेंची भाजपवापसी होणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

dcm devendra fadnavis reaction over eknath khadse meet amit shah and discussion of likely to join bjp again | Maharashtra Politics: नाथाभाऊंच्या भाजपवापसीवर फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला त्याबाबत...”

Maharashtra Politics: नाथाभाऊंच्या भाजपवापसीवर फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला त्याबाबत...”

Next

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, यातच आता भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. याला कारणही तसेच घडले आहे. मात्र, या सर्व प्रकरणाबाबत विचारणा केली असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरून खडसेंच्या ‘भाजपावापसी’वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, अमित शाहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे. या पुढेही भेटणार आहे. शाहांना भेटू नये असा नियम आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले होते. 

देवेंद्र फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या भाजपवापसीबाबत प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ खडसे पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याची चर्चा असून त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यासंदर्भात काय सांगाल? अशी विचारणा करताच फडणवीसांनी फक्त, मला त्याबाबत कल्पना नाही, असे एका वाक्यात उत्तर देत यावर अधिक बोलणे टाळले. तत्पूर्वी, एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यापासून देवेंद्र फडणवीसांशी असलेले त्यांचे वितुष्ट सर्वश्रुत आहे. खडसे पुन्हा भाजपमध्ये असल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की, मोठ्या प्रमाणावर यासंदर्भातले वेगवेगळे पुरावे एनआयए, एटीएस, केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळ सरकारने पीएफआयवर बंदीची मागणी केली आहे. आता तपासातून अनेक गोष्टी बाहेर येतील. यांच्या मोडस ऑपरेंडीनुसार देशात अस्वस्थता तयारर करण्याचे षडयंत्र होते. या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

 

Web Title: dcm devendra fadnavis reaction over eknath khadse meet amit shah and discussion of likely to join bjp again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.