जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:46 PM2023-05-22T17:46:01+5:302023-05-22T17:47:11+5:30

Maharashtra Politics: दोनवेळा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले.

dcm devendra fadnavis reaction over ncp jayant patil ed enquiry | जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

googlenewsNext

Maharashtra Politics: इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने दोन वेळा समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जयंत पाटील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. भाजपविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया दिली. 

आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. यानंतर आता जयंत पाटील यांना नोटीस देत चौकशीला बोलावण्यात आले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. 

त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल म्हणून...

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचे काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादे प्रकरण असेल म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावले असेल. जर जयंत पाटलांचा या खटल्याशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या देशामध्ये जे कोणी सत्यासोबत उभे आहे किंवा जे कोणी खरे बोलत आहे, किंबहुना जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे. हा पॅटर्न देशभरात सर्वत्र सुरू असून कुठेही लोकशाही दिसत नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
 

Web Title: dcm devendra fadnavis reaction over ncp jayant patil ed enquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.