Maharashtra Politics: “सनसनाटीसाठी विधानं करत नाही, योग्यवेळी सगळं सांगेन”; फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:49 PM2023-02-25T17:49:10+5:302023-02-25T17:49:59+5:30

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता, असा मोठा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

dcm devendra fadnavis replied thackeray group sanjay raut over criticism | Maharashtra Politics: “सनसनाटीसाठी विधानं करत नाही, योग्यवेळी सगळं सांगेन”; फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: “सनसनाटीसाठी विधानं करत नाही, योग्यवेळी सगळं सांगेन”; फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर

googlenewsNext

Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध विषयांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. पहाटेच्या शपथविधीवरून सुरू झालेली गौप्यस्फोटांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता या टीकेचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही. जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन. तसेच नामांतरावर बोलताना, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो की, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जो निर्णय घेतला होता, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव कारायचे, त्याला मान्यता दिली. त्यानुसार अधिसूचना काढलेली आहे. ही अधिसूचना काढल्यानंतर आता जिल्ह्याचे नाव बदलण्याची अधिसूचना महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका व नगरपालिका नाव बदलण्याचे नोटिफिकेशन हे नगरविकास विभाग काढेल. या दोन्ही नोटिफिकेशनची तयारी झालेली आहे. त्यामुळे यात कुठलाही गोंधळ नाही. नाव जे बदलले आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांचेच बदलले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना संपर्क केला होता का?

असे आहे की संपर्क तर झालाच होता. त्यानंतरही झाला होता. पण त्यावेळी मी उत्तर दिले की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहे. त्या क्षणी मला असेही सांगण्यात आले की जाऊदेत आता झाले ते झाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी खूप स्पष्टपणे सांगितले की आता ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही. जे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना आम्ही तोंडघशी पाडू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार बाहेर पडल्यावर आणि आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना तोंडघशी पाडण्याचा काही प्रश्नच येत नाही हे उत्तर मी दिले आणि तुमचं इतर काही असेल तर दिल्लीत बोला असेही मी त्यांना सांगितले, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dcm devendra fadnavis replied thackeray group sanjay raut over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.