Maharashtra Politics: मविआ सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:12 PM2022-09-17T19:12:00+5:302022-09-17T19:16:41+5:30

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसंदर्भात सूचक विधान केले.

dcm devendra fadnavis statement on can new shinde bjp govt likely to stop inquiry of jalyukt shivar yojana | Maharashtra Politics: मविआ सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Maharashtra Politics: मविआ सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Next

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार स्थापन झाल्याला आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेते सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. 

शिंदे-फडणवीस अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत. १३८ उद्योग एमआयडीसी मध्येच अडकले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही , अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करणार का?

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे निर्देश दिले होते. मात्र, आता यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. या नव्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेबाबत महत्त्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, आता जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, जिथे गडबड आहे अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही पण जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या चौकशी केली असेल, तर अशा चौकशा केल्या जाणार नाहीत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

दरम्यान, राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, असे सांगत अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सगळे आरोप करत राहतील. त्याची उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप कामे आहेत, असा टोला लगावत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अधिक भाष्य केले नाही. 

 

Web Title: dcm devendra fadnavis statement on can new shinde bjp govt likely to stop inquiry of jalyukt shivar yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.