अकोल्यातील अडीच हजार डिमॅट अकाउंट झाले डिअँक्टिव्हेट
By admin | Published: March 7, 2017 02:16 AM2017-03-07T02:16:50+5:302017-03-07T02:16:50+5:30
काही कंपन्यांन्याच्या दिवाळखोरीमुळे अकोल्यातील अडीच हजार डिमेट अकाउंट गत दोन वर्षांपासून डिअँक्टिव्हेट.
संजय खांडेकर
अकोला, दि. ६- शेअर बाजारात होणारे सततचे चढ-उतार आणि काही कंपन्यांन्याच्या दिवाळखोरीमुळे अकोल्यातील शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अडीच हजार डिमेट अकाउंट गत दोन वर्षांपासून डिअँक्टिव्हेट झाल्याची आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची बेसिक माहिती नसतानाही अनेकांनी शेअर मार्केटमध्ये उडी घेतली; पण शेअर बाजारातील फायद्यापेक्षा अनेकांना तोटा सहन करावा लागल्याने अनेक जणांना आर्थिक फटका बसला आहे. आज वर-वर स्वस्त शेअर काही कालावधीसाठी फायदेशीर ठरत असले, तरी तो फायदा कायमस्वरूपी नसतो. काही दिवसानंतर गुंतवलेली रक्कमही त्यातून निघणे कठीण होते. सुरुवातीला शंभर रुपयात काही कंपन्याचे शेअर गुंतवणूकदारांनी घेतले होते. ते दर वाढण्याऐवजी आता दहा रुपयांवर आले आहेत. अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्यांवर ५0 हजार कोटींचे कर्ज आहे, तर काही कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला असून, या क्षेत्रात वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सद्यस्थितीत अनेकांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. मल्टी नॅशनल कंपन्यांचे शेअरचे दर बर्यापैकी होते; पण त्या कंपन्यांचे शेअर खरेदी करणार्यांचीही संख्या कमी झाली आहे; परंतु काही नावाजलेल्या कंपन्यांनी पाच वर्षात पाच पट किंमत गुंतवणूकदारांना दिली.
मागील पाच ते सात वर्षांपूर्वी शेअर बाजार तेजीत होता. त्यामुळे अकोलासारख्या शहरातील गुंतवणूकदारांनी या क्षेत्र नशीब आजमावले; परंतु ती परिस्थिती आता नसल्याने अकोलासारख्या शहरातील गुंतवणूकदार या क्षेत्राच्या बाहेर पडत आहे.
त्याचा परिणाम डिमेट बँक खात्यावर झाला असून, जवळपास पाच हजार खातेदारांपैकी अध्र्या खातेदारांची खाती डिअँक्टिव्ह केली आहेत.
बाजारपेठेतील तेजी-मंदीच्या घडामोडीवर लक्ष ठेवून असणारा (इंस्टंट) गुंतवणूक करणारा आणि ट्रेडिंग करणारा मोठा वर्ग अकोल्यात आहे. कोट्यवधींची उलाढाल अकोल्यातून होते; पण शेअर बाजारातील अनिश्चिततेचा फटका या गुंतवणूकदारांना बसला आहे.
दरम्यान, गुंतवणूकदारांनी पुन्हा गुंतवणूक करावी, याकरिता बँका आणि शेअर बाजारात कोट्यवधी रुपये गुंतविणार्या कंपन्या गुंतवणूकदारांना विविध आमिषे देत असल्याचे वृत्त आहे.
आंतरराष्ट्रीआंतरराष्ट्रीय बजारातील शेअर घडामोडीचा कल समजण्यास सर्वसामान्यांचा आवाका कमी पडतो. त्यामुळे ब्रोकरने गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील य घडामोडीसह दीर्घ मुदतीचा योग्य सल्ला दिला, तर गुंतवणूकदारांची संख्या वाढेल. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर लक्ष असायला हवे.
- हंसराज अग्रवाल, शेअर ब्रोकर, अकोला
दहा ब्रोकर!
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देणारे अकोल्यात जवळपास ५0 ब्रोकर होते. गुंतवणूकदारांची संख्या घटल्याने शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणारे केवळ १0 ब्रोकर आहेत.