चर बुजविण्यासाठी मुदतवाढ

By admin | Published: May 16, 2017 02:31 AM2017-05-16T02:31:38+5:302017-05-16T02:31:38+5:30

खडीच्या तुटवड्यामुळे खोदलेल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी उरकण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांच्या कामांनी डोकेदुखी

Deadline | चर बुजविण्यासाठी मुदतवाढ

चर बुजविण्यासाठी मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खडीच्या तुटवड्यामुळे खोदलेल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी उरकण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांच्या कामांनी डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या कंपन्यांना चर बुजविण्यासाठी पालिकेने चार दिवसांची मुदत दिली आहे, तसेच चर खोदण्यास देण्यात आलेली परवानगी ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
दरवर्षी मुंबईत सुमारे चारशे कि़ मी. रस्ते विविध उपयोगिता सेवा कंपन्या खोदत असतात. नवीन केबल्स टाकणे किंवा दुरुस्तीसाठी गॅस कंपन्या, वीज कंपन्या अशा सुमारे २८ उपयोगिता सेवा कंपन्या खोदकाम करीत असतात.
मात्र, या कंपन्या काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते पूर्ववत करताना त्यात त्रुटी ठेवतात. त्यामुळे असे खोदकाम पालिकेसाठी डोकेदुखीचे ठरते, परंतु त्यातून मिळणारा महसूल आणि या सेवांची मागणी असल्याने, त्यांना परवानगी देणे पालिकेला क्रमप्राप्त ठरते.
मात्र, नवी मुंबईतील दगड उत्खननावर बंदी आल्यामुळे खडीचा पुरवठा बंद झाला आहे. याचा फटका रस्तेकामांना बसला आहे. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करणे पालिकेसाठी आव्हानच ठरणार आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांनी खोदलेले चर या अडचणीत भर घालत आहेत. त्यामुळे १९ मे पर्यंत आपले काम उरकून रस्ते व पदपथ पूर्ववत करण्याची ताकीदच महापालिकेने संबंधित कंपन्यांना दिली आहे.

Web Title: Deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.